एफ. डी. सी. एम. ऑफिस रोड ला रस्त्यावर तलावाचे आले रूप




व्येकटेश चालुरकर
तालुका प्रतिनिधी अहेरी

अहेरी. अहेरी तालुक्यातील आलापल्ली एफ डी सी एम रोड वर तलावाचे आकाराचे खड्डे पडले असून सुद्धा संमंधित अधिकारी मात्र लक्ष देत नसल्याचा आरोप राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे विदर्भ अध्यक्ष जावेद अली. जिल्हा अध्यक्ष किशोर शंभरकर यांनी आरोप केले आहे. गडचिरोली जिल्यातील महत्वाचे शहर म्हणून आलापल्ली ची ओढख आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रात मंत्री महोदय असून सुद्धा लक्ष न देत असल्याने जनता त्रस्त झाली आहे. गडचिरोली जिल्याचे पालकमंत्री ना. देवेंद्र फडणवीस असून सुद्धा गडचिरोली जिल्याची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. गडचिरोली जिल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जातीने लक्ष देऊन गडचिरोली जिल्यातील रस्त्यावर पडलेल्या खडयान कळे लक्ष देऊन कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिका संघटने चे विदर्भ अध्यक्ष जावेद अली, जिल्हा अध्यक्ष किशोर शंभरकर व संघटनेचे पद्धधिकारीयांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments