समिर महल्लेची राज्यस्तरीय कुस्तीपर्धेसाठी निवड



सेठ केसरीमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाचा
ईयत्ता १२ वी चा विद्यार्थी 
समिर महल्लेची कुस्तीस्पर्धेसाठी राज्यस्तरावर निवड झाली आहे.क्रीडा व युवक सेवा संचालन पुणे अंतर्गत शैक्षणिक सत्र २०२३-२४ साठी विभागीय स्पर्धेचे आयोजन वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील माननीय खासदार रामदासजी तडस इंनडोर स्टेडियम येथे आयोजित केला होता.या स्पर्धेमध्ये विविध विभागातून विभागीय स्पर्धेमध्ये भाग घेण्यास घेण्यात आले होते .यामध्ये सेठ केसरीमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी समीर महल्ले याने वजन गट ६२ किलो.मध्ये अंडर १७ ग्रुप मध्ये होता व त्याच्या विरुध्द चंद्रपुरचा मोहित नरेश चौगुंडे हा प्रतिस्पर्धी होता. अत्यंत चौकपणे समीरने प्रतिस्पर्धी चौगुंडेला चित्त केले व आपला डाव जिंकला.या विजयाने समिरची राज्यस्तरीय स्पर्धेकरीता निवड झाली आहे.


या स्पर्धेकरिता 
पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षिका मल्लिका नागपुरे यांनी विशेष मोलाचे मार्गदर्शन केले आणि पुढील स्पर्धेकरिता मनस्वी शुभेच्छा दिल्या.समीरच्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्या बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विनय चव्हाण तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर सुधीर अग्रवाल व पर्यवेक्षक व्हि बी वंजारी यांनी व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंदांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

0/Post a Comment/Comments