माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांची तेरवी कार्यक्रमाला उपस्थिती



सोनूले कुटुंबियांची आस्थेने केले विचारपूस

अहेरी:- माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांनी तानबोडी येथील स्व.राधाबाई टिकाजी सोनूले यांच्या तेरवी कार्यक्रमाला उपस्थित राहून सोनूले कुटुंबियांचे सांत्वन केले.

नुकतेच काही दिवसांपूर्वी तानबोडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते टिकाजी सोनूले यांच्या पत्नीचे दुःखद निधन झाले होते.२४ सप्टेंबर रोजी तेरवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी उपस्थित राहून सोनूले कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन आस्थेने विचारपूस करत दुःखात सहभाग झाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच स्थानिक तानबोडी येथील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments