मूलचेरा तालुक्यातील हरिनगर येथील फूटबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन



आजाद हिंद फुटबॉल क्रिडा मंडळाकडून सामन्याचे आयोजन

 मूलचेरा :तालुक्यातील हरिनगर येथे आजाद हिंद फुटबॉल क्रिडा मंडळाकडून आयोजित भव्य फूटबॉल सामन्याचे उदघाटन नुकतेच भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.

या उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून माजी जि.प.सदस्य रवी शहा तर प्रमुख पाहुणे म्हणून बीआरएस नेते टिल्लू मुखर्जी,प्रा.विठ्ठल निखुले,समीर अधिकारी,कमेटी चे अध्यक्ष अनाधी हलदर,पोलीस पाटील सदानंद रॉय,ग्राप सदस्या मालोती ज्योतदार,बिमल कर्मकार,अविनाश दास,वेलगुर उपसरपंच उमेश मोहूर्ले,प्रमोद सरकार,अरदेन बिस्वास,बाला सर,अशोक बडाल, विमल बैद्य,रवीन मंडल, अभिमन्यू हलदर आदि मान्यवरांसह आविस व बीआरएसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


            यावेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उदघाटन सोहळ्या प्रसंगी उपस्थित फुटबॉलचे खेळाडू व नागरिकांना फूटबॉल या मैदानी खेळाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.

          या फूटबॉल क्रिडा सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या कडून ठेवण्यात आले.

           हरिनगर येथील आजाद हिंद फुटबॉल क्रिडा मंडळाकडून आयोजित फूटबॉल सामन्याचे यशस्वीतेसाठी अनादी हलदर,प्रसंजीत गाईन,महानंद मंडल,दिपू किर्तनीया,रबीन मंडल,सदानंद रॉय,सरोजीत मंडल आदींनी परिश्रम घेतले.उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजीत सरकार सर यांनी मानले.या उदघाटनीय सोहळ्याला हरिनगरसह परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments