कंकडालवार दांपत्यांनी घेतले सार्वजनिक युवा गणेश मंडळांचे भेट व दर्शन!!



व्येकटेश चालुरकर
तालुका प्रतिनिधी अहेरी

अहेरी : तालुक्यातील आल्लापली येथील सार्वजनिक युवा गणेश मंडळ सावरकर चौक आल्लापली येते आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार व अहेरी पंचायत समिती माजी उपसभापती सौभाग्यवती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी सार्वजनिक युवा गणेश मंडळाला भेट देऊन विधिवत पूजन करून दर्शन घेत भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आली.त्यावेळी अजयभाऊंनी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख,समृद्धी,आनंदी जीवन लाभो ही विघ्नहर्ता श्रीगणेश चरणी प्रार्थना केली.

यावेळी उपस्थित माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,नरेश गर्गम,प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments