राष्ट्रीय मानव अधिकार संगठन जिल्हा कार्यकारी अध्यक्ष पदी शंकर ढोलगे



जिल्ह्यातील मागासलेल्या आलापल्ली सारख्या भागात समाजसेवेचा वसा उराशी बाळगून दिवस रात्रौ गरीब, निराधार व सर्वसामान्य जनतेच्या सुख दुःखात स्वतःला वाहून घेणारे शंकर ढोलगे यांनी भामरागड, ऐटापल्ली या सारख्या दुर्गम,अतिदुर्गम व अति मागासलेल्या आदिवासी परिसरात स्वतः पुढकार घेवून सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला जागृत करण्याचे त्यांनी अनेक कामे केलेली आहेत.

त्त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात केलेल्या व करीत असलेल्या सेवाभावी, त्यागमयवृत्ती, सामाजिक, प्रबोधनात्मक व आंदोलांत्मक कार्य कर्तृत्वाचि दखल घेवून,राष्ट्रीय अध्यक्ष महेश पटेल,व महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष प्रणय खुणे,यांनी राष्ट्रीय मानवधिकार संघटन गडचिरोली जिल्हा कार्यकारी अध्यक्ष पदी शंकर ढोलगे यांची नियुक्ती करून जिल्हा स्तरावर व म्हराष्ट्र स्तरावर जिल्ह्यातील गरीब,निराधार लोकांनवर होत असलेल्या अन्याय आत्याचाऱ्याच्या विरोधात प्रतिकार करण्याची त्याना न्याय मिळवून देण्याची त्यांना जनू एक संधीच दिलेली आहे.

 

त्यांच्या झालेल्या नियुक्तीचे प्रदेश सचिव ज्ञानेंद्र बिस्वास,विदर्भ अध्यक्ष जावेद अल्ली,जिल्हाध्यक्ष किशोर शंभरकर,एड.ज्योती डोके,प्रशांत जोशी, अजय ठाकरे, मनीषा आलाम,सुरेश अलोणे राजेंद्र चिमरालवार,तसेच आलापल्ली,ऐटापल्ली, भामरागड परिसरातील अनेक जनसामान्य, प्रतिष्ठित नागरिकांनी त्यांच्या नियुक्तीचे स्वागत केलेले आहे.

0/Post a Comment/Comments