*ट्रकने दुचाकीला चिरडले एकाच कुटंबातील तीघेजन ठार



मारोती बारसागडे तालुका प्रतिनिधी चामोर्शी


चामोर्शी लोह खनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडल्याने दुचाकी वरील तिघेजण ठार झाल्याची दुर्दैवी घटना 25 डिसेंबर सोमवारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली.
मार्कंडा देव येथील रहिवासी नरेश जंधलवार हे आपली पत्नी पुतण्याची पत्नी व त्यांच्या मुलासमवेत दुचाकीने चामोर्शी तहसील कार्यालयात काही कामानिमित्त गेले काम आटोपून ते परत येताना तहसील कार्यालयासमोर चामोर्शी वरून गडचिरोली कडे लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली यात नरेश गंधलवार यांची पत्नी व पुतण्याची पत्नी व मुलगा हे ठार झाले तर नरेश जंधलवार हे गंभीर जखमी झाले. अपघात होतात ट्रक चालक पसार झाला हा अपघात इतका भीषण होता की दुचाकी ट्रकच्या आत मध्ये फसली होती घटनेची माहिती होताच चामोर्शी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमीला उपचारासाठी चामोशी रुग्णालयात दाखल केले मृतकांना शवविच्छेदनासाठी दाखल केले . पुढील तपास चामोर्शी पोलीस करीत आहे . अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे भावना नरेश जंधलवार वय वर्ष 38 मू मार्कंडा देव प्रियंका गणेश जंधलवार वय वर्ष 24 मू मार्कंडा देव रुद्र गणेश जंधलवार वय वर्ष 5 मु मार्कंडा देव असे मृतकांची नावे आहेत तर नरेश जंधलवार वय वर्ष 45 असे गंभीर जखमी दुचाकी सरांचे नाव आहे एकाच कुटुंबातील तिघेजण ठार झाल्याने जंगलवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे व मार्कंडा देव येथे शोककळा पसरली आहे.

0/Post a Comment/Comments