महिलेचा बळी घेणारी टि-13 वाघीण अखेर जेरबंद





दिनांक 19.10.2023 रोजी श्रीमती ताराबाई एकनाथ धोडरे, वय 76 वर्ष, रा. आरमोरी (काळागोटा) यांना शेत सव्हे क्र. 6131 मध्ये T-13 या मादी वाघीणीने हल्ला करून ठार केले होते, शिवाय T-13 वाघीणीचे सदर परिसरातील वास्तव्य कायम असल्याने रामाळा- वैरागड या मार्गावर आवागमन करणाऱ्या नागरीकांचा पाठलाग करीत असल्याच्या बन्याच तक्रारी होत्या, त्यामुळे सदर मार्ग बंद ठेवण्यात आलेला होता. वनविभागाकडुन सदर वाघीणीचे संनियंत्रण करण्याची कार्यवाही सुरू होती.


T-13 या मादी वाघीणीमुळे रस्त्याने आवागमन करणाऱ्या नागरीकांना भविष्यात मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना घडून नयेत याकरीता मा. मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) म.रा. नागपुर यांचे परवानगीने आज दिनांक 23.10.2023 रोजी सदरील T-13 वाघीण (मादी) हिला आरमोरी वनपरिक्षेत्रातील आरमोरी उपक्षेत्रामध्ये मुल्लुर चक गावातील सव्हे क्र. 12/1 (झुडपी जंगल) मध्ये सकाळी 7.48 वा. डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर तथा RRT प्रमुख TATR व श्री अजय मराठे, शुटर, RRT सदस्य यांनी डार्ट करुन तो बेशुध्द करून त्यांचे चमुचे सहाय्याने वाघीणीला कोणतीही इजा न करता पिंजराबंद केले.


सदरची कार्यवाही मा. वनसंरक्षक (प्रा) गडचिरोली वनवृत्त, श्री रमेशकुमार यांचे मार्गदर्शनाखाली श्री धर्मवीर सालविठ्ठल, उपवनसंरक्षक वडसा वनविभाग, वडसा, श्री संदिप भारती, सहाययक वनसंरक्षक, वडसा, श्री पवनकुमार वनपरीक्षेत्र अधिकारी (प्रा) आरमोरी, यांचे उपस्थितीत व आरमोरी परिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी यांच्या सहाय्याने यशस्वीरित्या पूर्ण केली. सदर मोहिमेत RRT गडचिरोली चे श्री. दिपेश डि. टेंभुर्णे, श्री. योगेश डि. लाकडे, श्री. गुरुनानक ढोरे श्री. वसीम एन. शेख, श्री. विकास एस. ताजने, श्री. प्र फुल एन वाडगुरे, श्री. निकेश शेंद्र, श्री. मनन शेख, वाहन चालक, श्री. ए. डी. कारपे, वाहन चालक, श्री. ए. एम. दांडेकर, वाहन चालक यांनी सहभाग घेतला.

जेरबंद करण्यात आलेल्या T-13 वाघीण (मादी) ची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिला मा. बाळासाहेब ठाकरे, आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय गोरेवाडा, नागपुर येथे पाठविण्यात आले आहे. यावेळी वडसा वनविभागात वाघांचे अस्तित्व असल्यामुळे नागरिकांना विणाकारण वनक्षेत्रामध्ये प्रवेश करून नये, असे वनविभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments