अवैधरित्या जुगार खेळणाऱ्यावर पोलीसांची कारवाई ,4,34,480/रुपयांचा मुद्देमाल जप्त





गडचिरोली जिल्हयामध्ये सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या अनुशंगाने मा. पोलीस अधिक्षक  नीलोत्पल यांचे अवैधरित्या जुगार खेळणा-यांवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये दिनांक २१/१०/२०२३ रोजी पो.शि. ५५३८ ढोके पो.स्टे देसाईगंज यांना खात्रीशीर बातमीदाराकडून नविन लाइज येथील जंगल परिसरात काही इसम पैशाची बाजी लावून तीन पत्त्याचा हारजीतचा जुगार खेळत आहेत. अशी खात्रीशिर माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक रासकर पोलीस स्टेशन देसाईगंज यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर, पोलीस अंमलदार ढोके, पो/ अं ४०३२ सराटे, यांनी सापळा रचून इसम नामे १) अब्दुल रज्जाक अब्दुल सत्तार शेख रा. शिवाजी वार्ड, देसाईगंज जि. गडचिरोली २) शहेबाज जैनुददीन खान रा. कन्नमवारवार्ड देसाईगंज जि. गडचिरोली ३) मिलींद श्रावण फटींग रा. गांधीवार्ड देसाईगंज जि. गडचिरोली ४) गोवर्धन प्रल्हाद पत्रे रा. चिंचोली ता. ब्रम्हपुरी जि. गडचिरोली ५) मंगेश तुलसीदास पगाळे रा. हनुमानवार्ड ता. देसाईगंज जि. गडचिरोली ६) टिंकू जितेंद्र बडोले रा. गांधीवार्ड, देसाईगंज जि. गडचिरोली यांस पकडून त्यांचे ताब्यातून १४४८०/- रोख रक्कम व एकुण ०६ दुचाकी वाहने असा मिळून एकुण ४,३४,४८०/- रूपये किंमतीचा माल जप्त करून सदर आरोपीवर पो.स्टे. देसाईगंज येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)  कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान)  अनुज तारे, उपविभागीय पोलीस अधिकारी  साहील झरकर, यांचे मार्गदर्शनात पोस्टे देसाईगंज येथील पोलीस निरीक्षक  किरण रासकर यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि ज्ञानेश्वर धनगर, पोलीस अंमलदार संतोष सराटे, विलेश ढोके यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर हे करित आहेत.

0/Post a Comment/Comments