अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या इसमावर देसाईगंज पोलीसांची कारवाई



गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या नवरात्र उत्सवाच्या अनुशंगाने पोलीस अधिक्षक नीलोत्पल, यांचे अवैध दारू विक्रीवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये दिनांक २१/१०/२०२३ रोजी पो.शि. ४०३२ सराटे पो.स्टे. देसाईगंज यांना खात्रीशीर बातमीदाराकडून दुचाकी वाहनाने एक इसम मौजा कोरेगाव येथून कुरखेडा मार्गे छत्तीसगड येथे अवैधरित्या देशी दारूची वाहतुक करणार आहे, अशी खात्रीशिर माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक रासकर पोलीस स्टेशन देसाईगंज यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर, पोलीस अंमलदार ढोके, सराटे यांनी सापळा रचून इसम नामे टिकाराम दुधराम राऊत वय- २४ वर्षे रा. कोरंबी टोला, ता. अर्जुनी मोरगाव जि. गोंदिया यास पकडले व त्याचे ताब्यातून १) अॅक्टीव्हा काळया रंगाची दुचाकी वाहन क्र. एम एच २३ ए ई ३८७१ किं. ७००००/- रू. २) देशी दारु मंत्री कंपनीच्या १० मि.ली. मापाच्या प्लॅस्टीकच्या ४०० नग सिलबंद बॉटल किं.अं. ३२०००/- रु. असा एकूण १,०२,०००/- रु. किंमतीचा माल जप्त करून सदर आरोपीवर पो.स्टे. देसाईगंज येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर, यांचे मार्गदर्शनात पोस्टे देसाईगंज येथील पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि ज्ञानेश्वर धनगर, पोलीस अंमलदार संतोष सराटे, विलेश ढोके यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर हे करित आहेत.

0/Post a Comment/Comments