सेवाभावी कार्यकर्ते दिवाकर गराडे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस आरमोरी तालुका अध्यक्षपदी निवड





भास्कर फरकडे संपादक गडचिरोली वार्ता न्युज 

आरमोरी (गडचिरोली वार्ता न्युज): महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नामदार मंत्री धर्मरावबाबा आत्राम, रायुकाँचे सुरजदादा चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या मान्यतेने आरमोरी येथील सेवाभावी कार्यकर्ते दिवाकर गराडे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस आरमोरी तालुका अध्यक्षपदी निवड केली आहे.

नियुक्ती बाबतचे प्रमाणपत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर यांनी दिवाकर गराडे यांना प्रदान केले आहे.

निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमीन लालानी, तालुका कार्याध्यक्ष सुनील नंदनवार, शहर कार्याध्यक्ष प्रदीप हजारे, जिल्हा सरचिटणीस दिपक बैस, कुणाल राऊत, रामा खरकाडे, आकाश नारनवरे, पामुल दुमाने, विकास गराडे, कुणाल नारनवरे, पंकज खोब्रागडे आदींनी अभिनंदन केले आहे.

0/Post a Comment/Comments