पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या उपस्थितीत शहिद पोलिस स्मृती दिन संपन्न



पोलिस अधिकारी व अंमलदार तसेच आष्टी हद्दीतील ४२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

चामोर्शी: आज तालुक्यातील आष्टी येथील पोलीस ठाण्यात पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या उपस्थितीत शहीद पोलिस स्मृती दिन संपन्न झाला.


२१ ऑक्टोबर १९५९ या दिवशी लड़ाख़ मधील भारतीय सीमेवरील बर्फाच्छादीत व निर्जन अशा 'हॉटस्प्रिंग' या ठिकाणी भारताचे १० पोलीस जवान गस्त घालत असताना अचानक दबा धरून बसलेल्या चीनी सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्याला शेवटपर्यंत चोख प्रत्युत्तर देत असताना त्यांना वीरगती प्राप्त झाली. या वीर पोलिस जवानांनी भारतीय सीमेचे रक्षण करताना दाखविलेल्या त्या अलौकीक शौर्याची गाथा इतरांना कळावी तसेच राष्ट्र निष्ठेची व कर्तव्य निष्ठेची ज्योत प्रत्येकाच्या मनात तेवत रहावी म्हणून शहिद जवानांच्या स्मृतीपित्यर्थ २१ ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण भारत भर 'पोलीस स्मृती दिन' म्हणून पाळला जातो. 
या दिनाचे औचित्य साधून भारतातील विविध पोलीस दलामध्ये ज्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना अस्सीम ध्येय निष्ठेने आपले कर्तव्य बजावित असताना वीरगती प्राप्त झाली, त्या वीरांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी आजचा दिवस म्हणजे २१ ऑक्टोबरला आष्टी येथील पोलिस ठाण्यात पोलीस स्मृती दिन साजरा करुन शहीदांच्या पवित्र स्मृतींना विनम्रपणे अभिवादन करत स्मृती वंदना दिली. तसेच शहीद सुरेंद्र नैताम आणि शहीद प्रकाश गोंगले यांच्या प्रतिमा पोलीस स्टेशन आष्टी येथे त्यांनी केलेल्या शौर्यास अभिवादन म्हणून आज पासून कायमस्वरूपी लावण्यात आल्या. 
 तसेच पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्राणहिता कॅम्प येथे भव्य रक्तदान शिबिर चे आयोजन केल्याने पोलीस स्टेशन आष्टी येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच पोलीस स्टेशन आष्टी हद्दीतील असे एकूण 42 रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान केले.

0/Post a Comment/Comments