आलापल्ली येथील महावितरणचा उपकार्यकारी अभियंता वीस हजाराची लाच घेताना अडकला एसीबी च्या जाळ्यात



किशोर उसेंडी ग्रामीण प्रतिनिधी गडचिरोली 

महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी मर्यादीत, आलापल्ली येथिल येथील उप-कार्यकारी अभियंत्यास विस हजार रुपयांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली.विनोदकुमार नामदेवराव भोयर, वय ४७ वर्षे असे लाचखोर अभियंत्याचे नाव आहे. ही कारवाई दिनांक 17 ऑक्टोंबर मंगळवारी करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदार यांना त्यांचे घरगुती मीटर फॉल्टी असल्याचे कारण सांगून गैरअर्जदार श्री. भोयर, उप-कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या. आलापल्ली यांनी अंदाजे २.२० लाख रुपये दंड भरावे लागेल, असे बोलून सदर दंडाची रक्कम कमी करुन ७३,६९८/- रुपयांचा दंड केला व सदर दंडाची रक्कम कमी केल्याचा मोबदला म्हणून गैरअर्जदार श्री. भोयर यांनी ४०,००० /- रुपये लाच रक्कमेची मागणी केली. तक्रारदार यांना आरोपीस लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तक्रार दिली.

पोलीस निरीक्षक श्री. श्रीधर भोसले यांचे पर्यवेक्षणात पो. निरीक्षक श्री. शिवाजी राठोड यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले असता, त्यामध्ये पडताळणी दरम्यान तक्रारदार यांना त्यांचे घरगुती मीटर फॉल्टी असल्याचे कारण सांगून गैरअर्जदार श्री. भोयर, उप-कार्यकारी अभियंता यांनी अंदाजे २.२० लाख रुपये दंड भरावे लागेल, असे बोलून सदर दंडाची रक्कम कमी करुन ७३,६९८ /- रुपयांचा दंड केला. सदर दंडाची रक्कम कमी केल्याचा मोबदला म्हणून ४०,००० /- रुपये लाच रक्कमेची पंचसाक्षीदारासमक्ष सुस्पष्ट मागणी केली व आपले लोकसेवक पदाचा दुरुपयोग करुन स्वतः चे आर्थिक फायदयाकरीता वाम व भ्रष्ट मार्गाने सदर रक्कमेतील पहीला टप्पा रुपये २०,०००/- लाच स्विकारताता रंगेहाथ मिळून आले. यावरुन गैरअर्जदार यांचे विरुध्द पोलीस स्टेशन, अहेरी येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु असून त्यांचे मौजा वरोरा, जिल्हा चंद्रपूर येथील निवासस्थानांची अॅन्टी करप्शन ब्युरो, चंद्रपूर टीमकडून झडती घेण्यात येत आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. राहुल माकणीकर, अॅन्टी करप्शन ब्युरो, नागपूर, श्री. सचिन कदम, अपर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पो.नि. शिवाजी राठोड, सफ सुनील पेददीवार, पोहवा नथ्थु धोटे, राजेश पदमगिरवार, पोशि किशोर ठाकुर, संदीप उडान सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली व चापोना बिक्रमजीत सरकार, मोपवि गडचिरोली यांनी केलेली आहे.

पोलीसउपअधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो कार्यालय, गडचिरोली दुरध्वनी क्रमांक ०७१२ - २९५०२०, टोल फ्रि क्रमांक - १०६४ -

0/Post a Comment/Comments