पेंटींपाका ग्रा.पं.ची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच बालक्का रेड्डी यांचा भारत राष्ट्र समिती पक्षामध्ये प्रवेश



      माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी B.R.S पक्षाचा दुपट्टा टाकून पक्षात केला स्वागत

*◆अहेरी◆*:सिरोंचा तालुक्यातील पेंटींपाका ग्राम पंचायतचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (ना.धर्मराव बाबा आत्राम गट) सरपंच बालक्का सडवली रेड्डी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राम राम करीत भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या नेतृत्वावर आणि कामावर विश्वास ठेवत भारत राष्ट्र समिती या पक्षामध्ये जाहीर प्रवेश केल्या.यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी सरपंच बालक्का सडवली रेड्डी यांचा भारत राष्ट्र समिती पक्षाची दुपट्टा टाकून त्यांच्या पक्षात स्वागत केले.सदर पक्षप्रवेश हे आल्लापल्ली येथे माजी आमदार आत्राम यांच्या निवासस्थानी पार पडला.

               श्रीमती बालक्का सडवली रेड्डी यांचा बी.आर.एस.पक्ष प्रवेशामुळे पेंटींपाका सह परिसरातील गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नुकसान होण्याची शक्यता आहे,ज्या पक्षात राहतात त्या पक्षात सक्रिय राहून व पक्ष वाढीसाठी काम करीत असतात.

             सरपंच बालक्का सडवली रेड्डी हे सर्वपरिचित चेहरा असून पेंटींपाका गावासह परिसरातील गावांमध्ये त्यांच्या ओळखीसह दांडगा जनसंपर्क आहे.

     पेंटींपाका ग्राम पंचायत सरपंच बालक्का रेड्डी यांच्या पक्ष प्रवेशावेळी आल्लापल्ली येथे पेंटींपाका ग्रामपंचायतचे सदस्या दुर्गम सुदीष्णा अंतर्गम मोनिका,सुदुला गट्टू,आविस नेते वासू सपाट,सिरोंचा शहर प्रमुख गणेश रच्चावार,सारली दुर्गम,श्रीनिवास दुर्गम,अंतर्गम श्रीकांत,विजय बंदेला,आलापल्ली ग्राम पंचायतचे माजी सरपंच विजय कुसनाके,विनोद कावेरी,संदीप बडगे,अनिल नैताम,हरिदास ठोंबरे सह आविस व भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments