दुर्धर आजार ग्रस्त व्यक्तीला भाग्यश्रीताई आत्राम यांचे कडून आर्थिक मदत !!



अहेरी:-(बोरी)राजपुर पॅच येथील रहिवासी शंकर पोशन्ना गंगाधरीवार (५२)यांच्या पायाला दोन महिन्यांपूर्वी इजा झाली.कालांतराने त्या इजेचे रूपांतर मोठ्या व्याधीत झाले.आणि शंकर पोशन्ना गंगाधरीवार यांच्या पायाला गंभीर आजार उद्भवला.घरची परिस्थिती बेताची असल्याने वरील उपचार घेणे शक्य होत नव्हते त्यामुळे निराश होऊन ते घरीच थातुर माथूर उपचार घेत होते. हि वार्ता बोरी येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते महेश बाकीवार यांच्या निदर्शनास आली.त्यांनी हि वार्ता लगेच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांना कळवली.वार्ता कळताच भाग्यश्री आत्राम यांनी संबंधित रुग्णाला दहा हजार रुपयांची आर्थिक मदत पाठवली.

 शंकर पोशन्ना गंगाधरीवार यांच्या पायाला दोन महिन्यापूर्वी इजा होऊन त्याचे सेप्टिक फोडात रूपांतर झाले.तो अहेरी ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घेत होता.संपूर्ण तपासण्या दरम्यान त्याला जिल्हा ग्रामीण रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले परंतु त्या ठिकाणी त्याच्या आजारावर रामबाण इलाज झाला नाही. अशात त्यांची विचारपूस करण्यासाठी गेलेले महेश बाकीवार यांनी त्यांना वर्धा येथील सेवा ग्राम रुग्णालयात जाण्या साठी सांगितले.परंतु अडचण पैशा संदर्भात होती ती समस्या बाकीवार यांनी भायश्रीताई आत्राम यांच्या माध्यमातून सोडवून दिली. 

स्वतःच्या खिशाला कात्री लावून गरीब रुग्णांसाठी मदत करणारे दानशूर व्यक्ती समाजात फार कमी आहेत.काही अनामिक राहून वैद्यकीय उपचारांसाठी मदतीचे हात पुढे करतात तर काही संस्था रुग्णसेवेचा वसा घेऊन कार्य करीत असते. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेले कुटुंब आजारपणामुळे शारीरिक आणि मानसिकरीत्या खचून जातात.त्यांची हि अवस्था व रुग्णांची वेदना भाग्यश्रीताई आत्राम यांनी जवळून पाहिली आणि अनुभवली आहे. या अनुभवातून अशा असंख्य रुग्णांसाठी मदतीचा सेतू उभारायला हवा, असे त्यांना व त्यांच्या समविचारी मित्रांना वाटले. रुग्णांना आर्थिक मदतीची, मानसिक पाठिंब्याची व सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मनातील गैरसमज दूर करण्याची नितांत गरज असते हेही त्यांनी लक्षात घेतले. त्यातूनच बोरी येथील त्यांचे विश्वासू महेश बाकीवार व रामा बद्दिवार यांच्या मार्फत दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली.यावेळी महेश बाकीवार, रामा बद्दीवार, अशोक वासेकर, विजय कोकिरवार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments