पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी व डॉ. ए.पि.जे. अब्दुल कलाम जयंती साजरी



कामठी येथील सेठ
केसरीमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.यांची पुण्यतिथी तर डॉ ए पी जे कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षक श्री वंजारी सर होते. प्रमुख अतिथी जेष्ठ प्राध्यापक श्री मेंढे सर मंचावर उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना प्रा. विश्वनाथ वंजारी यांनी संतांच्या विचारातील राष्ट्रनिर्माणाची भावना विश्वधर्माच्या पुस्तकाचे कार्य आणि मानवतावादी प्रेरणेचा विचारप्रवाह आधुनिक काळामध्ये पुढे नेण्याचे कार्य विदर्भाच्या माती जन्मलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केले. तर डॉ ए पी जे कलाम यांची ओळख
संपूर्ण जगात 'मिसाईल मॅन' म्हणुन केली जाते. डॉ.कलाम यांनी देशाच्या कल्याणासाठी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. एक शिक्षक, शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपती म्हणून एपीजे अब्दुल कलाम यांनी आपले संपूर्ण आयुष्य कठोर परिश्रम आणि लोकांच्या सेवेसाठी वाहून घेतले होते. ते भारताचे अकरावे राष्ट्रपती होते. डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे विचार आजही लाखो तरुणांसाठी प्रेरणास्रोत आहेत,असे प्रतिपादन वंजारी सर यांनी केले.होते.कार्य क्रमाचे संचालन श्री बनसोड सर यांनी केले. तर
आभार प्रदर्शन श्री आशिष वरटकर सर यांनी केले.

0/Post a Comment/Comments