माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन



कोत्ताकोंडा येथे होणार 5 लाखांच्या निधीतून सिमेंट रस्त्याचे बांधकाम

एटापल्ली:तालुक्यातील अतिदुर्गम अश्या व घोटसुर ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट कोत्ताकोंडा येथे 5 लाखांच्या निधीतून सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम होणार असून नुकतेच माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी भूमिपूजन कार्यक्रमाला येथील सरपंच साधू कोरामी,ग्रा.प.सदस्य हरिदास कावडे,लालू उसेंडी,सुनील नरोटे,सावजी कोवासे,साईनाथ चटारे,गंगाराम इष्टाम, रामचंद्र चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

घोटसुर ग्रामपंचायत अंतर्गत टीरकटोला, रेंगाटोला आणि कोत्ताकोंडा आदी गावांचा समावेश असून या भागात पक्के रस्ते नसल्याने नागरिकांना पावसाळ्यात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते.त्यामुळे गावकऱ्यांनी भाग्यश्री ताई आत्राम यांच्याकडे विकास कामासाठी निधी देण्याची मागणी केली होती.नागरिकांची अडचण लक्षात घेत भाग्यश्री ताई आत्राम यांनी आमदार निधीतून तब्बल 5 लाखांचा सिमेंट रस्ता मंजूर केला असून नुकतेच या परिसरातील विविध गावांना भेटी देत विकास कामांचे भूमिपूजन केले.

गावकऱ्यांच्या मागणीची त्वरित दखल घेऊन सिमेंट काँक्रीट रस्ता मंजूर केल्याने परिसरातील नागरिकांनी भाग्याश्री ताई आत्राम यांचे आभार मानले.तर ताईनी गावातील उर्वरित विविध समस्यांची माहिती घेत त्याही लवकरच सोडविण्याचे आश्वासन दिले.

0/Post a Comment/Comments