कोरची तालुक्यातील दवंडी येथे एका इसमाची गळा चिरून हत्या




कोरची:- जितेंद्र सहारे

 कोरची : तालुका मुख्यालयापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या दवंडी येथे काल रात्री अकराच्या सुमारास काही अज्ञात इसमानी झोपीत असलेल्या लखन सोनार या व्यक्तीची गळा चिरून हत्या केली असल्यामुळे परिसरात एकच खडबड माजली आहे.
           मृत लखन सोनार च्या पत्नीने दिलेल्या माहितीप्रमाणे मृतकाची पत्नी सरिता सोनार व मृतक लखन सोनार हे एका खोलीमध्ये झोपून होते व बाजूच्या खोलीमध्ये मृतकाचा 12 वर्षाचा मुलगा व 16 वर्षाची मुलगी हे झोपून होते. रात्री अकराच्या दरम्यान 6 अद्यात लोक तोंडावर रुमाल बांधून आले व माझ्या गळ्यात चाकू लावून आरडाओरड करू नको अशी धमकी दिली व माझ्या पतीची गळा चिरून हत्या केली असल्याची माहिती पत्नीने दिली असून पुढील तपास पोलीस मदत केंद्र बेडगाव येथील पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल सूर्यवंशी करीत आहेत.

0/Post a Comment/Comments