खासदार संजय सिंह यांना ईडीने सूडबुद्धीने अटक केल्यामुळे, आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली केंद्र सरकारचा निषेध




गडचिरोली दि. ०६ : अंमलबजावणी संचालनालयाने सकाळी 7 च्या सुमारास आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या घरावर छापेमारी केली. दिल्ली सरकारच्या मद्य धोरणासंदर्भात चौकशीसाठी हा छापा टाकण्यात आला होता. या छापेमारीनंतर सलग 10 तास संजय सिंह यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आली आहे. 

संजय सिंह यांच्या घरातील वस्तू ईडी कडून अक्षरशा कचऱ्या सारख्या फेकून देण्यात आल्या, संजय सिंह यांच्या परिवाराला सुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला, ही अटक म्हणजे नरेंद्र मोदीनी ईडीला पुढे करून बदला घेण्याची चुकीची मानसिक प्रवृत्ती होय, दिवसेंदिवस आम आदमी पार्टीच्या प्रामाणिक लोकांना जेलमध्ये टाकण्याचा जो घाट मोदी सरकारने घातला आहे तो लोकशाही विरोधी आहे.

 
ईडी फक्त नरेंद्र मोदींच्या सांगण्यावरून काम करीत आहे, त्यांनी आपली स्वायत्तता सोडून मोदींची गुलामगिरी पत्करली आहे, अशा संस्थेबद्दल जनतेला आता कुठलाही विश्वास उरलेला नाही कारण ईडी ही आपले काम सोडून सांग काम्यासारखी झालेली आहे.

आम आदमी पार्टी वेगाने वाढत असल्यामुळे त्यांच्या शीर्ष नेत्यांना जेलमध्ये टाकून पार्टी कमजोर करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी सतत करीत आहेत, कुठलेही भरभक्कम पुरावे नसताना आम आदमी पार्टीच्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची ही पद्धत म्हणजे मोदींची राजकीय अपरिपक्वता आणि खुनशी प्रवृत्ती दिसते आहे.

या अटकेविरोधात आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली केंद्र सरकारची इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे 
 केंद्र सरकार आणि ईडी विरोधात घोषणा देत जाहीर निषेध नोंदविला आला आहे, यावेळी सामान्य जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती त्यावेळी आप चे जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे ,जिल्हा सचिव भास्कर इंगळे , ओबीसी आघाडी संतोष कोटकर ,संघटनमंत्री संजय जीवतोडे ,महिला आघाडी मीनाक्षी खरवडे ,युवा महिला आघाडी सोनल ननावरे,महिला संघटनमंत्री दीपिका गोवर्धन ,सेवानिवृत्त आघाडी दिवाकर साखरे,आर टी आय आघाडी चोखजी ढवळे ,शहर प्रमुख नामदेव पोले , शहर संघटनमंत्री रुपेश सावसाकडे, युवा आघाडी प्रमुख साहिल बोधले, महिला शहर प्रमुख रेखा निकुरे,मीडिया प्रमुख अनिल बाळेकरमकर,नितीन नैताम ,महेश बोरकर , इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments