तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत पोरवाल संघ विजयी




तायवाडे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, कोराडी येथे संपन्न झालेल्या तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धेत पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाने दिल्ली पब्लिक स्कुलचा ७ विकेट पराभवदणदणीत विजय प्राप्त केला. पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाचा कप्तान सोहम सपाटे ने नाबाद सोळा रनाची खेळी खेळून विजयश्री खेचून आणली.उपकप्तान अंबरीश द्विवेदीने उत्कृष्ट गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.दिल्ली पब्लिक स्कूल ने प्रथम फलंदाजी करत ४५ रणांचे लक्ष पोरवाल कनिष्ठ महाविद्यालया समोर ठेवले होते. प्रत्युत्तरात पोरवाल कॉलेजने ४ षटकातच लक्ष पूर्ण करत विजय प्राप्त केला. तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धा क्रीडा युवक सेवा संचालन महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी अंतर्गत क्रीडा समिती द्वारा आयोजित करण्यात आली होती.तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षिका प्रा. मल्लिका नागपुरे यांनी विशेष मोलाचे मार्गदर्शन केले आणि पुढे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.जिल्हा स्तरीय क्रिकेट स्पर्धा जी रुबी क्लब, डब्लू सी एल कॉलनी, सेमीनरी हिल्स, नागपूर जवळ होणार आहे .विजयी टीम चे अभिनंदन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय चव्हाण तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुधीर अग्रवाल व पर्यवेक्षक प्रा. वंजारी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृदांनी केले.

0/Post a Comment/Comments