विभागीय वनहक्क समितीपुढे बाजू मांडण्यासाठी तानबोडी येथील नागरिकांना नागपूरला जाण्यासाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडलावार यांनी करून दिली वाहनाची व्यवस्था!!




अहेरी : अनेक वर्षांपासून वनहक्क मिळण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या अहेरी तालुक्यातील नागरिकांना जिल्हास्तरीय समितीने वनहक्क नाकारल्याने या नागरिकांनी विभागीय समितीकडे अपिल केले होते.त्यानुसार अनेक नागरिक नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयाकडे आपली बाजू मांडण्यासाठी शुक्रवारी सकाळी रवाना झाले. आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडलावार यांनी त्या नागरिकांना जाण्यायेण्यासाठी 3 स्कॉपिओ व्यवस्था करून दिली.

अहेरी तालुक्यातील तानबोडी परिसरातील अनेक नागरिकांचे वनहक्काचे दावे २०२१ मध्ये जिल्हास्तरीय समितीने फेटाळले होते.त्यामुळे व्यथित होऊन या नागरिकांनी न्याय मागण्यासाठी विभागीय वनहक्क समितीकडे १८ फेब्रुवारी २०२२ रोजी अपिल केले होते. त्यावर विभागीय वनहक्क समितीचे सचिव तथा अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर यांनी १४ ऑक्टोबर रोजी सुनावणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयात हजर राहण्याची सूचना केली होती.त्यामुळे हे नागरिक आपल्याकडील पुराव्यांसह नागपूरसाठी रवाना झाले.सकाळी 11 वाजेपर्यंत सुनावणीसाठी हजर होणे आवश्यक असल्याने अजय कंकडलावार यांनी सर्वांसाठी स्पेशल स्कॉपिओ चे व्यवस्था करून दिली.त्यामुळे त्यांनी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडलावार यांचे आभार मानत आपल्याला आता योग्य न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे.

यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी जि.प.सदस्य अजय नैताम, माजी सदस्य सुनीता कुसनाके,माजी सभापती सुरेखा आलम,सरपंच शयलू मडावी,मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,नरेश गर्गम,विनोद रामटेके,रवी भोयर,प्रमोद गोडसेलवार,लक्ष्मण आत्राम सह इतर तानबोडी गावातील नागरिक उपस्थित आहे.

0/Post a Comment/Comments