देसाईगंज पोलीसांनी छत्तीसगड जाणाऱ्या अवैध दारू तस्कराचे आवळल्या मुसक्या



देसाईगंज पोलीसांनी छत्तीसगड जाणाऱ्या अवैध दारू तस्कराचे आवळल्या मुसक्या


गडचिरोली जिल्हयामध्ये सुरू असलेल्या नवरात्रेत्सवाच्या अनुशंगाने पोलीस अधिक्षक नीलोत्पल, यांचे अवैध दारू विक्रीवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये दिनांक २४/१०/२०२३ रोजी पोलीस अंमलदार संतोष सराटे पो.स्टे देसाईगंज यांना खात्रीशीर बातमीदाराकडून दुचाकी वाहनाने एक इसम लाखांदूर येथून देसाईगंज करखेडा मार्गे छत्तीसगड येथे अवैधरित्या विदेशी दारूची वाहतुक करणार आहे, अशी खात्रीशिर माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री रासकर पोलीस स्टेशन देसाईगंज यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर, पोलीस अंमलदार दिनेश राऊत, विलेश ढोके, संतोष सराटे, नरेश कुमोटी यांनी सापळा रचून इसम नामे अश्विन भागवत मँडे वय - २३ वर्षे रा. आंबेडकर वार्ड, देसाईगंज ता. देसाईगंज जि. गडचिरोली यास पकडले व त्यांचे ताब्यातून १) अॅक्टीव्हा निळ्या रंगाची दुचाकी वाहन क्र. एम एच ३३ यु ४७५६ किं. ७०००० /- रू. २) रॉयल स्टैग कंपनीचे डिलक्स व्हिस्की १८० मि.ली. मापाच्या दोन खरड्या रंगाचे बॉक्स ९६ नग सिलबंद निपा किं.अं. २८,८००/- रू. असा एकूण ९८,८००/- रु. किंमतीचा माल जप्त करून सदर आरोपीवर पो.स्टे. देसाईगंज येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर, यांचे मार्गदर्शनात पोस्टे देसाईगंज येथील पोलीस निरीक्षक श्री किरण रासकर यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि ज्ञानेश्वर धनगर, पोलीस अंमलदार दिनेश राऊत, संतोष सराटे, विलेश ढोके, नरेश कुमोटी यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अंमलदार दिनेश राऊत हे करित आहेत.

0/Post a Comment/Comments