भारतीय जनता पार्टी सिरोंचा तालुका अध्यक्षपदी दिलीप सेनिगारापू यांची निवड



        भारतीय जनता पार्टी सिरोंच्या तालुका अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता दिलीप सेनिगारापू यांची निवड जिल्हा अध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी केली आहे सेनिगारापू हे मागील 17,18 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे काम निष्ठेने करत असून तालुका कार्यकारणीत व जिल्हा युवा मोर्चा कार्यकारणीत, याआधी अनेक पदे भूषवले होते मात्र एक सामान्य कार्यकर्ता म्हणून ओळख असलेला शनिगारापू याला भारतीय जनता पार्टीचा तालुकाध्यक्ष निवड होणे म्हणजे भारतीय जनता पार्टी नेहमीच मेहनती कार्यकर्त्यांना न वगळता त्यांना पद देणे म्हणजे हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच शक्य आहे. एका सामान्य कार्यकर्त्याला तालुका अध्यक्षाची निवड होणे म्हणजे हे भारतीय जनता पार्टी मध्येच शक्य आहे असे म्हटले जात आहे सेनिगारापुर यांची निवडीचे श्रेय गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अंबरीशराव आत्राम, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, आमदार रामदासजी आंबटकर गडचिरोली जिल्ह्याचे माजी अध्यक्ष किसनजी नागदेवे, गडचिरोली चिमूर क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक नेते व जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम व जिल्हा महामंत्री रविभाऊ ओललावार, महामंत्री गोविंद सारडा, भाजपाचे ज्येष्ठ नेते सत्यनारायण मंचालवार यांना दिलेला आहे हा निवड म्हणजे आश्चर्यचकित करणारा असून माझ्यावर दाखवलेले विश्वासाला, मी पक्षाला भटकट करून पक्ष मजबुतीचे काम करणार आणि पक्षाला मजबूत समोर नेणार असे सेनिगारापू यांनी व्यक्त केली त्यांच्या तालुकाध्यक्ष निवडीबद्दल भारतीय जनता पार्टीचे संदीप राचर्लावार, बापांनां रंगूवार, शंकर नरहरी,कलाम हुसेन,रवि चकिनारापुवार, माधव कासर्लावार नागेश ताडबोईना, सितापती गट्टू, भास्कर गुडमेटला श्रीनाथ राऊत, श्रीनिवास चिल्कामारी, तिरुपती नूसेट्टी, मल्लांना संगर्ती, मधुकर नीलम व आदींनी अभिनंदन केले आहे

0/Post a Comment/Comments