पब्लिक स्कूल शाळेचे दोन विद्यार्थ्यांचे नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यश



राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली

 एटापल्ली: येथील संस्कार संस्था एटापल्ली द्वारा संचालित संस्कार पब्लिक स्कूल येथील कु. अंश बिदूर अधिकारी व कु.दीक्षा मुकेश मंडल या दोन विद्यार्थिनींची नवोदय विद्यालय घोट प्रवेश परीक्षा परीक्षेत पात्र म्हणून निवड झाली आहे.
 या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी योग्य ती मेहनत घेऊन हे यश मिळवले आहे .या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले तसेच मुख्याध्यापक यांचेही सहकार्य लाभले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे तालुक्यातून अभिनंदन अभिनंदन केले जात आहे. त्यांनी यशाचे श्रेय आई- वडील व संस्कार पब्लिक स्कूलच्या शिक्षकांना दिले

0/Post a Comment/Comments