राजेंचा वाढदिवस साजरे करण्याचा चाहत्यांचा ज्वर शमता शमेना.!!



सर्वत्र देवी नवरात्र ऊत्सवाचा ऊत्साह असतांना यंदा घटस्थापनेच्या दिवशीच राजे साहेबांचा वाढदिवस आल्याने त्यांच्या चाहत्यांचा जोश द्विगुणीत झाला होता.राजे साहेबांच्या वाढदिवशी सकाळ पासुनच ठिकठिकाणी विवीध कार्यक्रमांची रेलचेल सुरु होती.कार्यकर्त्यांची प्रेमाची आमंत्रणे स्विकारत राजे साहेब देखील लहान-मोठ्या अशा प्रत्येक ठिकाणी भेटी दिल्या आणि त्यांच्या समवेत वाढदिवस साजरा केला.राजमहालात रात्रो ऊशीरा पर्यंत चाहत्यांचे जत्थे येतच होते अशात काहींना राजे साहेब त्यादिवशी वेळ देऊ शकले नव्हते परंतु कार्यकर्त्यांचा ऊत्साह मात्र यत्किंचीतही कमी होत नाहीये.काल हाॅकी ग्राऊंड येथील दांडीया-गरबा महोत्सव २०२३ च्या ऊघ्दाटन प्रसंगी पुन्हा जोरदार वाढदिवस सेलीब्रेशन झाल्याने हा फिवर सुरुच राहील असे वातावरण आहे.!

0/Post a Comment/Comments