आम आदमी पार्टीचा धनगर समाजाच्या उपोषणाला पाठींबा,आम आदमी पार्टी उचलनार प्रश्न




गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील झाडे कुणबी कुणबी हा शब्द वगळून धनगर व तत्सम जातितील अनुक्रमांक १५ वरील झाडे या पोटजातीचा नाम सदृश्यतेचा गैरफायदा फायदा घेत भटक्या जमाती (क) प्रवर्ग दाखवून खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नौकरीत रुजु झालेले आहेत. पर्यायाने धनगर समाजाच्या सवलती लाटत आहेत या प्रश्नाला घेऊन धनगर समाजातील तरुण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. उपोषण मंडपाला आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे,जिल्हा सचिव भास्कर इंगळे,शहर अध्यक्ष नामदेव पोले,शहर संघटन मंत्री रुपेश सावसाकडे यांनी भेट दिली. गडचीरोली जिल्ह्यातील पोलिस भरतीत खोट्या जात प्रमाण पत्राच्या आधारे १३ झाडे उमेद्वारांची अवैध पद्धतीने निवळ करण्यात आली आहे. तर राज्य राखीव पोलीस दलात पाच उमेदवारांची निवळ झाली आहे. त्यामुळे ख-या भटक्या जमाती क प्रवर्गातील उमेद्वारावर अन्याय झाला आहे. अन्यायग्रस्त उमेदवार धनगर समाजाचे अध्यक्ष लचमाभाऊ शिरगावार, प्रवीण लंबुंवार, गणेश देवावार,मोरेश्वर पोटेवार,भारत सिर्गावार, खुशाल मल्लेलवार, भोजराज लांबेवार,जितेंद्र काडीवार,अमोल सिद्दमवार,मल्लेश योग्गावार,निखील उम्मलवार,अक्षय मिडपलवार,भोलेश्वर फेबुलवार, राहुल अन्नावार,शुभम शिर्गावार,प्राची मेडेवार,हे उमेद्वार उपोषनाला बसले आहेत. उपोषण कर्त्यांना आम आदमी पार्टीचा पाठींबा असुन अन्यायग्रस्त उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम आदमी पार्टी प्रश्न उचलून,आंदोलन करणार आहे. न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments