खासदार अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते व प्रयत्नाने मंजूर पन्नास लक्ष रुपयांचे जल जिवन मिशन कार्यक्रम अंतर्गत मौजा- पंदेवाही येथे नळ पाणीपुरवठा टाकीचे लोकार्पण सोहळा संपन्न



राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली 

जल जिवन मिशन ही केंद्र शासनाची पुरस्कृत व महत्वांकाक्षी य़ोजना

दि.०९ ऑक्टोंबर २०२३

 एटापल्ली :-जल जिवन मिशन कार्यक्रम अंतर्गत मौजा-पंदेवाही ता.एटापल्ली जि.गडचिरोली या गावात मंजूर पन्नास लक्ष रुपयांचे पाणी पुरवठा टाकीचे लोकार्पण सोहळा गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अंनु.जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

 केंद्र शासनाची पुरस्कृत योजना जलजीवन मिशन हर घर जल,हर घर नल ,या योजनेचा लाभ प्रत्येक गावांनी घ्यावा.पाणी हे जीवन आहे. पाण्यासाठी अनेक गावांतील ग्रामीण भागांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती.
यासाठी देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी हर घर नल,हर घर जल हि योजना आणली. या योजनेअंतर्गत नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी या योजनेचा उद्देश असुन या योजनेद्वारे प्रत्येक घरात पिण्याचे पाणी मिळावे. हा योजनेचा उद्देश आहे यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत ही योजना जनतेसाठी लाभदायी. प्रत्येक गावांनी लाभ घेऊन, चांगला उपयोग करावा.असे व्यक्तव्य विचार यावेळी खासदार अशोकजी नेते यांनी केले.

या प्रसंगी प्रामुख्याने एटापल्ली भाजपा तालुकाध्यक्ष निखील गादेवार, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदिप कोरेत,युवा मोर्चा जिल्हा महामंत्री सागर डेकाटे, जिल्हा सचिव बाबुराव गंफावार,विजय नल्लावार,अशोक पुल्लुरवार, प्रसाद पुल्लुरवार, प्रसाद दासरवार,संपत पैदाकुलवार,प्रशांत मंडल,मनोज मुजुमदार,व इतर गावातील नागरिक आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments