जे. एम. पटेल महाविद्यालयात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व IT क्षेत्रातील संधी या विषयावर व्याख्यान



 भंडाऱ्यातील तरुण व्यावसायिक प्रशांत मिश्रा यांच्या कंपनीच्या २२ देशात शाखा 

जे. एम. पटेल महाविद्यालयातील विज्ञान शाखेतर्फे सोमवार दिनांक ३० ऑक्टोबर रोजी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व IT क्षेत्रातील संधी या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. IQAC सेल, संगणक विभाग, महाविद्यालयातील सर्व विज्ञान शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. 
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते क्लिक - टू- क्लाऊड या जागतिक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व तरुण व्यावसायिक श्री प्रशांत मिश्रा हे होते. हा कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे हे होते. डॉ. ढोमणे यांनी श्री प्रशांत मिश्रा यांच्या कार्याचा तसाच आजच्या काळात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे महत्व विशद केले. आज आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे सर्वच क्षेत्रात कसा आमूलाग्र बदल होत आहे याबद्दल विद्यार्थ्यांना अवगत केले. 
याप्रसंगी क्लिक - टू- क्लाऊड या कंपनीचे CEO श्री प्रशांत मिश्रा यांनी आपल्या भंडाऱ्यातील जन्मापासून ते आपल्या CEO पर्यंतचा प्रवास उलगडला. भंडाऱ्यातील हिंदी माध्यमातून शिक्षण घेतल्यामुळे त्यांना मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिद्ध कंपनीमध्ये कसा शिरकाव करता आला याबद्दल सांगितले. त्यांनी आतापावेतो दोन कंपन्या करोडो रुपयात विकून भरघोस नफा मिळविला. व त्यातून आज स्थापित झालेल्या क्लिक - टू- क्लाऊड या कंपनीविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. क्लिक - टू- क्लाऊड या कंपनीचे जगभरात २२ देशात कार्य चालत असून हि कंपनी क्लाऊड टेकनॉलॉजि सोबतच कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चा वापर करून शेतकऱ्यांना शेतीपूरक माहिती देते. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीच्या प्रतवारीनुसार कोणचे पीक घ्यावे, पिकांना किती पाणी द्यावे, किती खते द्यावीत याची इत्यंभूत माहिती आर्टिफिशिअल इंटेलिजन्स द्वारे त्यांची कंपनी देते हे सांगितले. शरद पवार यांच्या बारामतीत सुद्धा हा प्रकल्प ते राबवित आहेत. 
मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना असे सांगितले कि यशासाठी तुम्ही कोणच्या गावात राहता, तुम्हाला कोणची भाषा येते, तुमचा रंग-रूप कसा आहे यांनी काहीही फरक पडत नसून तुमची मेहनतच तुम्हाला यश मिळवून देईल असे सांगितले. 
या कार्यक्रमादरम्यान क्लिक - टू- क्लाऊड या कंपनीचे श्री प्रविण ठाणेकर तसेच कु. अदिती यांनी कंपनीच्या इतर कामाबद्दल व कंपनीच्या कार्यप्रणालीबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी प्रशांत मिश्रा यांनी सांगितले कि, क्लिक - टू- क्लाऊड जे. एम. पटेल महाविद्यालयासोबत लवकरच सामंजस्य करार करणार असून त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना 
क्लाऊड कॉम्पुटिंग चे प्रशिक्षण देऊन इंटर्नशिप च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना IT क्षेत्रात संधी उपलब्ध करून आहेत. 
या कार्यक्रमाचे संचलन डॉ. जी.बी. तिवारी यांनी केले तर आभार डॉ सबाह नसीम यांनी व्यक्त केले. 
हा संपूर्ण कार्यक्रमा च्या आयोजनासाठी IQAC समन्वयक डॉ कार्तिक पनीकर, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ शाम डफरे, संगणकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रविण घोसेकर, डॉ श्रीधर शर्मा, डॉ विनी ढोमणे, डॉ सबाह नसीम, सौ प्रियंका शर्मा, श्री पलाश फेड्डेवार, डॉ. प्रताप पटले, श्री कौशिक कटरे यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, शिक्षक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते

0/Post a Comment/Comments