चंद्रपुरात पद्मशाली समाजाचा राज्यस्तरीय उपवधूवर परिचय मेळावा 26 ला नोव्हेंबर ला

Gadchirollivartanews, editor Bhaskar Farkade


चंद्रपुरात पद्मशाली समाजाचा राज्यस्तरीय उपवधूवर परिचय मेळावा 26 ला नोव्हेंबर ला

चंद्रपूर (प्रतिनिधी) पद्मशाली फाऊंडेशन चंद्रपूरच्यावतीने पद्मशाली समाजाचा उपवधूवर परिचय मेळावा 26 नोव्हेंबरला सकाळी 10 ते 5 या वेळेत जिजाऊ सभागृह रामसेतु पुलाजवळ, दाताळा रोड चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
त्याचाच भाग म्हणून यावर्षी चंद्रपुरात उपवधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय पद्मशाली समाजाचे अध्यक्ष डॉ.स्वामी कंदीकुटला रा.हैद्राबाद हे राहणार असून उद्घाटन प्रख्यात हदयरोगतज्ज्ञ डॉ.अशोक वासलवार यांच्या हस्ते होणार आहे. या मेळाव्याचे स्वागताध्यक्ष डॉ.चंद्रशेखर अल्लेवार आहेत. या मेळाव्यात पद्मशाली समाजातून निवडून आलेल्या नगरसेवकांसह लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात येणार आहे.तसेच याप्रसंगी उपवधु-वर यांची स्मरणिका ही प्रकाशित करण्यात येणार आहे. या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन पद्मशाली फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरज बोम्मावार, उपाध्यक्ष लोकेश परसावार, सचिव किशोर आनंदपवार, कोषाध्यक्ष संतोष गोटमुकुलवार यांनी केले आहे.

चौकट...
सामाजिक जाणीवेतून फाऊंडेशनची स्थापना
पद्मशाली समाजातील तरूण एकत्र येऊन 10 वर्षांपूर्वी पद्मशाली फाऊंडेशनची स्थापना केली. त्यानंतर 2017 मध्ये फाऊंडेशनच्यावतीने मार्कंडा येथे पहिला उपवधूवर परिचय मेळावा घेण्यात आला होता. त्यानंतर 2019 मध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी विदर्भस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा घेण्यात आली. विविध क्षेत्रात अग्रगण्य कामगिरी बजावलेल्या मान्यवरांना पद्मसमाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.

0/Post a Comment/Comments