आष्टी येथे पोलिस दादालोरा खिडकी अंतर्गत भव्य जनजागरण मेळावा,व्हॉलीबॉल व कबड्डी स्पर्धेचे आयोजन

Gadchirollivartanews, editor Bhaskar Farkade


आष्टी येथे पोलिस दादालोरा खिडकी अंतर्गत भव्य जनजागरण मेळावा,व्हॉलीबॉल व कबड्डी स्पर्धेचे आयोजन

उपस्थितांना १५० वृक्ष वाटप, तर ८८ नागरिकांनी सदर जनजागरण मेळाव्यातील योजनेचा घेतला लाभ


चामोर्शी: पोलिस स्टेशन आष्टी येथे आज दि. २३/११/२३ रोजी गडचिरोली पोलीस दला अंतर्गत दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन पोलीस स्टेशन आष्टी येथे भव्य जनजागरण मेळावा व व्हॉलीबॉल स्पर्धा, कबडडी स्पर्धा आयोजीत करण्यात आले. सदर मेळावा व स्पर्धा हे पोलीस अधिक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधिक्षक अनुज तारे, चिंता, देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनातुन घेण्यात आला. हा कार्यक्रम महात्मा ज्योतीबा फुले हायस्कुल आष्टीच्या प्रांगणात पार पडला.

सदर कार्यक्रमासाठी प्रमख पाहुणे बेबीताई बुरांडे (सरपंच आष्टी), डॉ. दामोधरे सा. ग्रा.रू.आष्टी म्हणुन उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पोलीस निरीक्षक कुदंन गावडे यांनी भुषविले. सदर मेळाव्यात दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन पोस्टे हददीतील नागरीकांकडून पॅन कार्ड, आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड, ई-श्रम कार्ड इत्यादी प्रकारचे दाखले काढण्यासाठी लागणारी प्रकीया पुर्ण करूण हददीतील एकुण ८८नागरीकांनी सदर मेळाव्याच्या अनुषंगाने लाभ घेतला. आदिवासीची संस्कृती असणारे वृक्ष संवर्धनाच्या दिशेने एक पाडुल म्हणुन पोलीस स्टेशन आष्टी च्या वतीने उपस्थितांना एकुण १५० वृक्ष वाटप करण्यात आले. सदर मेळाव्यात ग्रामिण रूग्णालय आष्टीच्या वतीन मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. सोबत किडा स्पर्धामध्ये कबड्डी आणि व्हॉलीबॉलच्या स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धामध्ये कबड्डी मध्ये अनुक्रमे प्रथम कमांक चंदनखेडी, व्दितीय कमांक आष्टी, तृतीय कमांक आष्टी नोकेवाडा, व व्हॉलीबॉल मध्ये अनुक्रमे प्रथम कमांक चौडमपल्ली, व्दितीय कमांक मार्कडां कं., तृतीय कमांक एम.जे.एफ. क्लब आष्टी यांनी पटकाविले सदर मेळाव्यात पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषनांत उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदर जनजागरण मेळावा यशस्वी करण्यासाठी आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अथक परिश्रम घेतले यावेळी आष्टी पोलीस स्टेशन हद्दीतील पोलिस पाटील, खेळाडू, नागरिक, महिला भगिनीं, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते 


 

0/Post a Comment/Comments