मोस्ट वॉन्टेड असलेल्या बड्या दहशतवाद्यांची पाकिस्तानमध्ये हत्या

Gadchirollivartanews, editor Bhaskar Farkade
मोस्ट वॉन्टेड असलेल्या बड्या दहशतवाद्यांची पाकिस्तानमध्ये हत्या

प्रा डॉ सुधीर अग्रवाल

दहशतवादाबाबत आता पाकिस्तानचा पर्दाफाश झाला आहे. संपूर्ण जगाला माहीत आहे की, यावेळी दहशतवाद्यांना कुठेही सहज आश्रय मिळत असेल तर तो पाकिस्तान आहे. असे अनेक दहशतवादी अजूनही पाकिस्तानमध्ये लपून बसले आहेत, ज्यांनी मास्टर माईंड प्लॅन बनवले आणि भारतावर अनेक हल्ले केले. पण आता या दहशतवाद्यांच्या डोक्यावर मृत्यूचे सावट आहे. पाकिस्तानच्या कुशीत मुसंडी मारणारे हे दहशतवादी आता एकामागून एक मारले जात आहेत. गेल्या काही महिन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, पाकिस्तानातील अनेक मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केले. दहशतवाद्यांच्या सततच्या हत्यांमुळे सध्या पाकिस्तानात बसलेले अनेक नेते दहशतीत आहेत. आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये भारताच्या विध्वंसाची स्वप्ने पाहणाऱ्या किंवा कोणत्याही दहशतवादी हल्ल्यात सामील असलेल्यांचा समावेश आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात भारताविरोधात कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना यमसदनी पाठविण्यात येत आहे.तीन महिन्यांत चार शत्रू मारले गेले आहेत. पाकिस्तानमध्ये एकानंतर एक अशा चार बड्या दहशतवाद्यांची अज्ञातांनी हत्या केल्यानंतर पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयची झोप उडाली आहे. या चार दहशतवाद्यांना कुणी मारलं हे अद्याप समोर आलं नाही. त्यामुळे आयएसआय कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या सुरक्षेत वाढ केल्याची माहिती समोर येत आहे. दाऊदला स्पेशल कमांडोची सुरक्षा देण्यात आली असून त्याच्या निवासस्थानाच्या सुरक्षेतही वाढ केल्याची चर्चा आहे. दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानमध्ये असून त्याला आयएसआयची सुरक्षा असल्याची माहिती आहे. तसेच इतर काही दहशतवाद्यांच्या सुरक्षेतही पाकिस्तानने वाढ केल्याचे वृत्त आहे. या वर पाकिस्तान सरकार आणि लष्कर दोघेही मोहन बाळू आहेत त्यांनी आतापर्यंत यावर कोणतेही वक्तव्य केलेले नाही काही काळापासून तेथे सातत्याने दहशतवादी मारले जात आहेत.

भारतासाठी मोस्ट वाँटेड असलेला लष्कर-ए-तोयबाचा (एलईटी) माजी नेता अक्रम खान यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. पाकिस्तानातील बाजौरमध्ये अक्रम खान उर्फ अक्रम गाझी याची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. दहशतवादी अक्रम गाझी याने २०१८ ते २०२० या काळात लष्कर भरती कक्षाचे नेतृत्व केले. तसेच ते पाकिस्तानमध्ये भारतविरोधी भाषणांसाठी ओळखला जात होते. अक्रम हा लष्कराच्या प्रमुख कमांडरांपैकी एक आहे. तो बराच काळ दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता.

तर ६ मे रोजी खलिस्तानी कमांडो फोर्सचे प्रमुख परमजीत सिंग पंजवाड याचीही पाकिस्तानात हत्या करण्यात आली होती. लाहोरमधील पंजवाड येथे काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. तो बराच काळ लाहोरमध्ये राहून काम करत होता. पंजवाड हा पाकिस्तानातील तरुणांसाठी शस्त्र प्रशिक्षणाचेही काम पाहत होता. यापूर्वी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) येथील रावळकोट भागात दहशतवादी मोहम्मद रियाद मारला गेला होता. अज्ञात हल्लेखोराने त्यांच्या अंगावर चार गोळ्या झाडल्या होत्या.

पाकिस्तानात अतिरेक्याची निर्घृणपणे हत्या होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी मुफ्ती कैसर फारुख, खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवाड, एजाज अहमद अहंगर, बशीर अहमद पीर यांसारख्या अनेक दहशतवाद्यांनाही अज्ञात हल्लेखोरांनी ठार करण्यात आलं आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये, भारताचा आणखी एक मोस्ट वाँटेड दहशतवादी शाहिद लतीफचीही पाकिस्तानमध्ये हत्या करण्यात आली होती. सियालकोटमध्ये लतीफला काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घातल्या. २०१६ मध्ये पठाण कोट एअरफोर्स स्टेशनवर झालेल्या हल्ल्याचा लतीफ मास्टरमाइंड होता. एअरफोर्स स्टेशनवर हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांना तो पाकिस्तानमधून सूचना देत होता.

आता परत एकदा भारताच्या आणखी एका शत्रूचा पाकिस्तानात खात्मा झाला आहे. लष्कर-ए- तोयबाचा माजी कमांडर अक्रम खान उर्फ अक्रम गाझी याची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अक्रम भारताविरुद्ध सातत्याने गरळ ओकायचा. अक्रम खान याने २०१८ ते २०२०या काळात लष्करातील भरतीचे काम पाहिले होते. अशातच अक्रमची पाकिस्तानात हत्या करण्यात आली आहे.

एकामागोमाग चार दहशतवाद्यांना ठार मारल्याने आयएसआयला धक्का बसला आहे. यानंतर पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या भारतविरोधी दहशतवादी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांची सुरक्षा वाढवली आहे. कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमच्या संरक्षणासाठी पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे कमांडो तैनात करण्यात आले आहेत. दाऊदला पाकिस्तानी लष्कराने एक बुलेट प्रूफ वाहन आणि टीम दिली असल्याची माहिती आहे. 

दाऊद इब्राहिम हा १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी असून घटनेपासून तो पाकिस्तानमध्ये आश्रय घेत आहे. तिथे बसून दाऊद भारतातही आपले काळे धंदे चालवत आहे. 

गुप्तचर अहवालानुसार, कारागृहात कथितरित्या उपस्थित असलेल्या सय्यद सलाहुद्दीनसह इतर काही दहशतवादी नेत्यांची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. जेणेकरून कारागृहात असताना त्यांच्यावर कोणताही हल्ला होऊ नये.

तेहरिक-ए-तालिबानवर हत्येचा संशय

या दहशतवाद्यांच्या हत्येत तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेसह अन्य काही दहशतवादी संघटनांचा हात असल्याचा संशय पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला आहे. मारले गेलेले आणि आता ज्यांना संरक्षण पुरवण्यात आलेले असे सर्व दहशतवादी भारतात वॉन्टेड आहेत, त्यांना पाकिस्तानने आश्रय दिला आहे.

९५६१५०४३०६

0/Post a Comment/Comments