एक दिवा माणुसकीचा लावू या... प्रा डॉ सुधीर अग्रवाल वर्धा


एक दिवा माणुसकीचा लावू या...

प्रा डॉ सुधीर अग्रवाल वर्धा







दीपावली हा प्रकाशाचा उत्सव आहे. अंध:काराला घालवून देणारा उत्सव! हा आनंदाचा उत्सव आहे. दीपावली जवळ आली की तिच्या स्वागतासाठी सर्वांची लगबग सुरू होते. महिला दीपावलीसाठी फराळाचे पदार्थ बनविण्यात दंग असतात. घरातील पुरुष मंडळी आणि परिसरातील साफसफाई करण्यात गढून गेलेले असतात. घरातील मुले-मुली दरवाजासमोर रांगोळी काढण्यात आणि आकाशकंदील करण्यात बिझी असतात. एकीकडे सर्वांचे मोबाइलवरून-व्हॉट्सअपवरून आणि कम्प्युटरवरून ई-मेल करून ‘दीपावली शुभसंदेश’ देणे सुरूच असते. दीपावलीची खरेदी केली जाते. दीपावलीचे चार दिवस का होईना, सर्व आबालवृद्ध स्त्री-पुरुष चिंता, दु:ख विसरून दीपावलीचे मोठ्या उत्साहाने स्वागत करीत असतात. अंधाराला दूर करुन प्रकाश आणणारा हा सण प्रत्येकालाच प्रिय असतो. परंतु, आता त्या अंधाराबरोबरच अज्ञान, अस्वच्छता, आळस, अनीती, अविचार, भ्रष्टाचार आणि अंधश्रद्धा यांच्या अंधाराला घालवून ज्ञान, स्वच्छता, उद्योगशीलता, नीती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्या प्रकाशाला आणण्याची आता खरी गरज आहे.माणुसकी जपण्याची गरज आहे. दीपावलीसारख्या सणांद्वारे असे करता येईल का? कारण दीपावली हा सण प्रकाशाचा उत्सव आहे. अंधाराला घालवून प्रकाश आणणारा हा उत्सव आहे. हा तेजाचा उत्सव आहे. हा समृद्धीचा उत्सव आहे. म्हणून हा आनंदोत्सव साजरा करताना आपल्या अवती भवती गोर गरीब ,वंचित पीडित फुटपाथावर जीवन जगणारे, फुटपाथावर लहान लहान व्यवसाय करणारे लोक देखील राहतात..त्यांची देखील दिवाळी असते.ते देखील गरीब असले तरी शेवटी माणसच न.त्यांनाही इच्छा,आहे,त्यांनाही मन आहे..त्यांनाही जिवन जगण्याचाअधिकार आहे.त्यांनाही गोडधोड खाण्याची ईच्छा होत असते.त्यांनाही स्वतंत्र जिवन जगण्याचा अधिकार आहे.म्हणून दिवाळी हा आनंदोत्सव साजरा करताना एक दिवा या गोरगरिबांसाठी देखील आपण तेवत ठेवावा..या दीन दुबल्यांना.प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करून अशांना आपण मदत केली पाहिजे.
दिवाळी निमित्याने आपण अनेक गोडधोड पदार्थ बनवीत असतो..आपण या पदार्थाचा स्वाद घेताना या वंचित गोर गरीबाना देखील आपल्या सामील करून घ्यायला पाहिजे.त्यांना मिठाई,कपडे नमकिन भेट म्हणून आपण दिले पाहिजे.
गोर गरीबां जवळ पैसे नसतात.काम करतो म्हटल तर यातील बहुतांश लोकांना काम मिळत नसते.काम करण्याची इच्छा असूनही ओळखी अभावी त्यांना काम मिळत नसते.असे वंचित लोकांना आपण डावलने म्हणजे त्यांच्या वर अन्याय करण्यासारखे होईल..आपण सर्व मनुष्य प्राणी आहोत. आपल्यात माणुसकी आहे.नसेल ती निर्माण करा..आणि त्यांच्यासाठी शक्य ती मदत करून त्यांनाही आपल्या सुखात सामील करून घ्या.

दीपावली मोठया आनंदाने साजरा करता यावा यासाठी आपण मोठया प्रमाणावर खरेदी करत असतो. कपडे लत्ते सोन्या-चांदीचे दागिने,मिठाई, दिवे, हार फुले,रांगोळी,मेणबत्ती अशा अनेक वस्तू आपण बाजारातून खरेदी करत असतो.दिवाळी निमित्ताने अनेक गोर गरीब फुटपाथावर छोट्या छोट्या वस्तू विकतात.जसे की दिवे, हार तुरे, फुलें अशा वस्तू आपण या गोर गरीबांकडून घेतल्यास त्यांना चार मिळतील.अशा वस्तू त्यांच्याकडून खरेदी करून अप्रत्यक्ष आपण त्यांना मदत करू शकतो..

धनत्रयोदशीच्या दिवशी दीपदान करण्यास सांगण्यात आलेले आहे. दीपदानाबरोबरच वस्त्रदान, अन्नदान करून गरीबांना दीपावली सण साजरा करण्यासाठी मदत करावयाची असते. दान म्हणजे डोनेशन नव्हे! डोनेशनमध्ये ती देणाराचे नाव जाहीर केले जाते. परंतु, दान हे गुप्त ठेवावयाचे असते. एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कलता कामा नये असे सांगण्यात आलेले आहे. आपण दीपावली सणाचा आनंद घेत असताना इतरांच्या जीवनातही आनंद निर्माण करण्याची ही संधी घेतली पाहिजे. दीपावली सणाच्या निमित्ताने आपण ‘एक दिवा माणुसकीचा पेटवू या..
एक दिवा माणुसकीचा आपल्या अंतरी पेटवा,

माणूस म्हणून जगा आणि माणुसकी जागवा,

एक दिवा आपलेपणाचाही लावा ,
कुठलेही तिरस्कार मनी न ठेवता फक्त तेवत ठेवा,

एक दिवा त्या अंतरी सदैव तेवत ठेव मानवा,

त्या तेजात दिसावा तुज सदैव माणुसकीचा ठेवा,

चोहीकडे जरी अंधार विझलेत सारे रवी तारे,

चाल तू नित नित पुढे मनाचा दिवा तेजोमय हवा,

त्या तेजात दिसावा तुज सदैव माणुसकीचा ठेवा......

हसतील येथे काजवे लावुनी टीमटीम प्रकाश

जे फक्त रात्रीचे पाहुणे तू चाख परमार्थाचा मेवा

त्या तेजात दिसावा तुज सदैव माणुसकीचा ठेवा.....

एक तो दिवा घेवून चालत राहा युगेयुगे

नको विझू दे ती वात जप तो दिवा नेहमी देवा
त्या तेजात दिसावा तुज सदैव माणुसकीचा ठेवा.

९५६१५९४३०६

0/Post a Comment/Comments