आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शक्ती केंद्रप्रमुख तथा भाजपा बूथ पालक मेळावा

Gadchirollivartanews, editor Bhaskar Farkade


आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शक्ती केंद्रप्रमुख तथा भाजपा बूथ पालक मेळावा

आमदार कृष्णा गजबे यांचे शक्ती केंद्रप्रमुख तथा बुथ पालकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

दिनांक 19 नोव्हेंबर 2023


देसाईगंज : भारतीय जनता पार्टी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शक्ती केंद्रप्रमुख तथा बूथ पालकांचा मेळावा दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी सोमवारला देसाईगंज येथील सिंधू भवन हुतात्मा स्मारक जवळ च्या सभागृहामध्ये दुपारी १ वाजता होणार असून या मेळाव्याला बूथ पालकांनी तसेच शक्ती केंद्रप्रमुखांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार कृष्णा गजबे यांनी केले आहे.
       या मेळाव्याला भारतीय जनता पार्टीचे गडचिरोली जिल्ह्याचे प्रभारी बाळाभाऊ अंजनकर, खासदार अशोकजी नेते, आमदार कृष्णा गजबे, आमदार डॉक्टर देवरावजी होळी, भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रशांतजी वाघरे, लोकसभा संयोजक किसनजी नागदेवे, विधानसभा प्रमूख प्रकाशजी सावकार पोरेड्डीवार, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा लोकसभा विस्तारक बाबुरावजी कोहळे, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे यांचे सह जिल्ह्याचे महामंत्री मार्गदर्शन करणार आहेत.

Bjp Gadchiroli Chimur Loksabha 
#bjpArmori

0/Post a Comment/Comments