तुषार दुधबावरे इतिहासात विषयात पेट परीक्षा उत्तीर्ण "

Gadchirollivartanewsportal, editor Bhaskar Farkade


"तुषार दुधबावरे इतिहासात विषयात पेट परीक्षा उत्तीर्ण " 
           " इतिहास विषयात पीएचडी साठी पात्र "
  "  चामोर्शी शहरातील, संताजी नगर वार्डातील शेतकरीपुत्र तुषार रमेश दुधबावरे हे संशोधनासाठी नेट ,सेट च्या धर्तीवर घेण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठाची नुकताच निकाल लागलेली पीएचडी करिता पेट परीक्षा 2023 पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करून यश संपादन केले.
  प्रामुख्याने इतिहास हा विषय कला शाखेतील अत्यंत कठीण व तितकाच भीतीदायक विषय समजला जातो.
   तुषार चे पदव्युत्तर पदवी साठी चे उच्चशिक्षण हे पुण्यातील नामांकित महाविद्यालय महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे आबासाहेब गरवारे महाविद्यालय ,पुणे मधून इतिहासात (एमए) झाले .     
    तुषार ने आपल्या यशाचे श्रेय आईवडील, कुटूंब ,शिक्षकवृंद आणि सहकार्य करणाऱ्या आपल्या भावासमान मित्रमंडळींना दिलं आहे.
    

0/Post a Comment/Comments