देसाईगंज तालुक्यातील डोंगरगाव (हलबी) येथील वाचनालयाचे उदघाटन संपन्न

Gadchirollivartanewsportal, editor Bhaskar Farkade


देसाईगंज तालुक्यातील डोंगरगाव (हलबी) येथील वाचनालयाचे उदघाटन संपन्न

नव्या पिढीला वाचनाभिमुख करण्यासाठी वाचनालय निर्माण करावे:- आमदार कृष्णा गजबे 

दिनांक:- २८/११/२०२३

देसाईगंज:
      वाचनाने व्यक्ती प्रगल्भ होऊन प्रगतीची दिशा खुली होते. त्यामुळे नव्या पिढीला वाचनाभिमुख करण्यासाठी वाचनालय निर्माण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले.
     ते दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ रोजी देसाईगंज तालुक्यातील डोंगरगाव (हलबी) येथे वाचनालयाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. 
     यावेळी गावातील तरुण मंडळी व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. 
      आमदार कृष्णा गजबे पुढे म्हणाले की, वाचन केले तरच ज्ञानाची, नव्या माहितीची दारे खुली होतील. त्यासाठी पुस्तकांची गोडी नव्या पिढीत निर्माण होणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात ग्रंथचळवळ रुजविण्यासाठी व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आदी साहित्य गावातच उपलब्ध व्हावे यासाठी अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून प्राप्त पुस्तकांचा सदुपयोग व्हावा, यासाठी गावोगाव प्रयत्न व्हावेत. सर्वांनी पुढाकार घेऊन नव्या पिढीला वाचनाकडे वळविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

0/Post a Comment/Comments