प्रा.हीना कौसर पीएच.डी पदवीने सन्मानित

Gadchirollivartanewsportal, editor Bhaskar Farkade


प्रा.हीना कौसर पीएच.डी पदवीने सन्मानित

सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय, कामठी येथील इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका हीना कौसर यांना नुकतीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून १११ व्या दीक्षांत समारंभात पीएच.डी प्रदान करून सन्मान करण्यात आला. ही पदवी भारताच्या मा. राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत देण्यात आली. "दलित शॉर्ट स्टोरीज : अ मेसेज ऑफ रेवोल्युशन" या विषयावर त्यांनी शोधप्रबंध सादर केला आहे. डॉ.वर्षा वैद्य यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विनय चव्हाण उपप्राचार्य डॉ.सुधीर अग्रवाल, मित्र व कुटुंबीय यांनी अभिनंदन केले आहे.

0/Post a Comment/Comments