ब्रह्मपुरीतील पेठ वार्डात कार्तिक गोपाल काला उत्साहात संपन्न...

Gadchirollivartanewsportal, editor Bhaskar Farkade 


ब्रह्मपुरीतील पेठ वार्डात कार्तिक गोपाल काला उत्साहात संपन्न...

हजारो नागरिकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ...

ब्रह्मपुरी..
सार्वजनिक हनुमान देवस्थान मंडळ पेठ वार्ड ब्रह्मपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने २ डिसेंबर २०२३ कार्तिक गोपाल काल्याचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुख्यत्वे अनाथाचा बाप या सामाजिक मराठी नाट्य प्रयोगाचे यावेळी आयोजन सुद्धा करण्यात आले.
ब्रह्मपुरी शहराची शैक्षणिक आरोग्य नगरी अशी एक वेगळी ओळख असली तरी ब्रह्मपुरी ची वाढती लोकसंख्या बघता अख्ख्या ब्रह्मपुरीला पेठ वार्डातील नागरिक जेवणासाठी या दिवशी आमंत्रित करतात. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा या कार्यक्रमासाठी प्रचंड नागरिकांची गर्दी उसळली होती. या प्रभागाच्या वतीने वर्षभर विविध क्रिकेट स्पर्धा असो की कुस्ती स्पर्धेसह अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी ब्रह्मपुरी येथील पेठ वार्डातील कलाकारांच्या संचात अनाथाचा बाप या मराठी नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक रसिक श्रोत्यासह नाट्यप्रेमींनी या नाटकाचा भरभरून आस्वाद घेतला. ब्रह्मपुरीस्थित पेठ वार्डातील या नागरिकांनी कार्तिक गोपाल काल्याची ही सत्तर वर्षाची परंपरा अजही कायम ठेवली आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पेठ वार्डातील अनेक ज्येष्ठ मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, नेते मंडळी मोलाचे सहकार्य करतात. त्यामुळे हा धार्मिक गोपालकाला ब्रह्मपुरी शहरात प्रसिद्ध आहे

0/Post a Comment/Comments