गेवर्धा येथे सिमेंट रस्ता बांधकामाचे भुमिपूजन


गेवर्धा येथे सिमेंट रस्ता बांधकामाचे भुमिपूजन
  
 🖋 ताहिर शेख🔸 १२/०१/२०२४ कूरखेडा:- गट ग्रामपंचायत गेवर्धा अंतर्गत गेवर्धा येथे मा.कृष्णाजी गजबे आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र यांनी सुचविलेले 2515 -1238 इतर विकास कार्यक्रम अंतर्गत श्री.बबलूभाई हुसैनी जिल्हाध्यक्ष भाजपा अल्पसंख्याक आघाडी गडचिरोली यांचे प्रयत्नातून शास्त्रीनगर येथे नेहरू कुमरे ते दिनकर पुराम यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता अंदा.रक्कम 10 लक्ष रु. बांधकामाचे भूमिपूजन सरपंच सुषमा मडावी यांचे शुभ हस्ते पार पडले.
        याप्रसंगी ग्रा.पं. सदस्य रोशन सय्यद, तंटामुक्ती अध्यक्ष राजु बारई, ग्रामकोष समिती अध्यक्ष राजेंद्र कुमरे, ग्रामसभा अध्यक्ष सुरेश पुसाम, ग्रामसभा सचिव सुधीर बाळबुद्धे, तंटामुक्ती सदस्य मडावी,ग्रामविकास अधिकारी प्रदीप भांडेकर,विलास मैंद, फिरोज पठाण, नरेश गायकवाड,दिनकर पुराम, विनायक राऊत,रेशीम शेंडे,अनिता राऊत, वंदना कुमरे, ताराबाई राऊत, कमल राऊत,ग्रा.पं.कर्मचारी कृष्णा मस्के, दिनेश कावळे, राहुल नखाते, अमिता नाहामूर्ते आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments