पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक पालक सभा संपन्न


पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक पालक सभा संपन्न

कामठी येथील सेठ केसरीमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात आज दिनांक १०/१/२४ रोजी शिक्षक पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते.सभेच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक प्रा व्हीं बी वंजारी होते.तर प्रमुख अतिथी म्हणून पालक श्री प्रा मनोज सपाटे, भूदल विभागातील सैनिक श्री सिंग साहेब , प्रा किरण पुडके उपस्थित होते.याशिवाय श्री सुनिल जाधव,शमीम अंसारी व इतर पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेला कनिष्ठ महाविद्यालयीन सर्व शिक्षक उपस्थित होते..शिक्षक सभेत विद्यार्थ्याची उपस्थिती,विद्यार्थ्यांच्या समस्या, स्वच्छता अभियान,वृक्षारोपण आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन प्रा.कमल गंधेवांर यांनी तर आभाप्रदर्शन प्रा. ललित मासुरकर यांनी केले.तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ 
प्रास्ताविक : डॉ. निता वानखेडे यांनी केले .

0/Post a Comment/Comments