पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात सावित्री बाई फुले यांची जयंती साजरी


पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात सावित्री बाई फुले यांची जयंती साजरी

पोरवाल कनिष्ठ महाविद्यालय,कामठी येथे

भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले य
 यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ सुधीर अग्रवाल व प्रमुख वक्ता म्हणून प्रा.पंकज गौरकर व पर्यवेक्षक प्रा व्ही. बी. वंजारी उपस्थित होते. प्रा डॉ सुधीर अग्रवाल यांनी सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.अध्यक्षीय भाषणातून प्रा डॉ सुधीर अग्रवाल यांनी सावित्री बाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला.अत्यंत प्रतिकूलपरिस्थितीत सावित्री बाई फुले यांनी शिक्षणाचे प्रेरणादायी कार्य केले.त्यांनी केलेल्या शिक्षण विषयक कार्याची ज्योत सतत तेवत ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.प्रमुख वक्ता म्हणून प्रा.पंकज गौरकार यांनी 
सावित्रीबाई या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या,असे सांगतानाच सावित्री आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते सावित्रीबाई भारताची पहिली महिला शिक्षिका, समाजसुधारक आणि मराठी कवीयत्री होती. विधवांचे पुनर्विवाह, अस्पृश्यता निर्मूलन, महिलांना शोषणातून मुक्त करणे तसेच दलित महिलांना शिक्षित करणे यासारख्या महत्वाच्या कार्ये त्यांनी केल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमांचे संचालन प्रा.ललित.मासुरकर यांनी तर आभारप्रदर्शन प्रा मनोज सपाटे यांनी केले.कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मच्यारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments