पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात हुतात्मा दिंन साजरा


पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात हुतात्मा दिंन
साजरा


सेठ केसरीमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात म. गांधी यांची पुणयतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ सुधीर अग्रवाल होते. मंच्यावर पर्यवेक्षक प्रा विश्वनाथ वंजारी होते.याप्रसंगी म गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून.दोन मिनिटांचे मौन राखण्यात आले.गांधी यांची पुणयतिथी संपुर्ण देश भर हुतात्मा दिंन म्हणुन साजरा केला जातो.या प्रसंगी डॉ सुधीर अग्रवाल यांनी म गांधी यांच्या कार्यावर प्रभाव टाकला.मोहनदास करमचंद गांधी हे भारताला सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर नेणाऱ्या प्रमुख स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक होते. स्वातंत्र्यानंतर काही महिन्यांनी म्हणजे ,३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली. गांधी स्मृतीमध्ये नथुराम गोडसेने बिर्ला हाऊसमध्ये संध्याकाळी प्रार्थनेला जाताना गांधींवर गोळ्या झाडल्या. या दिवसाची इतिहासात गांधीजींची पुण्यतिथी म्हणून कायमची नोंद झाली आहे.
महात्मा गांधी यांच्या हत्येवर देशभरातच नव्हे तर जगभरातून शोक व्यक्त करण्यात आला. महात्मा गांधी यांनी अहिंसक पद्धतीने लोकांना संघटित करून बलाढ्य ब्रिटिश राजवटीविरोधात रस्त्यावर उतरवण्यात यश मिळवले. महात्मा गांधी यांना जगातील इतर देशांतील मानवाधिकार चळवळी, नेत्यांनी आपले आदर्श मानले. महात्मा गांधी यांचा स्मृतीदिन हा हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो,असे प्रतिपादन अग्रवाल सर यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.मासुरकर सर यांनी केले.कार्यक्रमाला बहूसंख्य विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments