पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात 'परीक्षा पे चर्चा 'कार्यक्रमाचे आयोजन


पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात 'परीक्षा पे चर्चा 'कार्यक्रमाचे आयोजन

पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा पे चर्चा या विषयावर व्याख्यान : कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान पर्यवेक्षक प्राध्यापक विश्वनाथ वंजारी सर यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक मेश्राम सर होते प्राध्यापक मेश्राम सरांनी परीक्षा पे चर्चा या विषयावर मार्गदर्शन केले त्यामध्ये त्यांनी परीक्षा पे चर्चा वर "नमो ॲप" डाऊनलोड करायला सांगितला व ह्या ॲप वरती रजिस्ट्रेशन कसं करायचं ते सर्व शिक्षकांना व मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष करून दाखवले व सर्वांचे रजिस्ट्रेशन व्यवस्थित पणे करून दिले. यामध्ये 300 शब्दांपर्यंत माहिती लिहायची आहे. विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेविषयीची जी भीती आहे ती कशी दूर करता येईल याविषयी लिहायचं आहे व ही सर्व माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत ह्या ॲपद्वारे पोहोचणार आहे व उत्कृष्ट लिखाणाला चांगलं पारितोषिक सुद्धा मिळणार आहे. जे जे यामध्ये माहिती पाठवणार आहेत त्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे व पोस्टाने घरपोच सुद्धा सर्टिफिकेट येणार आहे. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक ललित मासुरकर सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्राध्यापक आशिष वरटकर सर यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments