जिल्हास्तरीय शालेय बाल तथा अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेत भामरागड तालुक्याचा ऐतिहासिक विजय


जिल्हास्तरीय शालेय बाल तथा अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेत भामरागड तालुक्याचा ऐतिहासिक विजय



गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय बाल तथा अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांची दि.१० च्या रात्री सांगता झाली. या चार दिवसीय महोत्सवात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या स्पर्धांमध्ये धानोरा पंचायत समिती सर्वसाधारण विजेता,तर गडचिरोली पंचायत समितीचे कर्मचारी उपविजेता ठरले.शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धांमध्ये भामरागड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री स्वप्नील मगदूम यांच्या आणि गटशिक्षणाधिकारी श्री जनार्दन वडलाकोंडा यांच्या नेतृत्वात शालेय क्रीडा संमेलनात सर्वाधिक स्पर्धामध्ये आघाडीवर राहून जिल्हाभरात भामरागड तालुका प्रथम स्थान पटकाऊन ऐतिहासिक विजय मिळवल्यामुळे सर्व स्थरावरून कौतुक केल्या जात आहे तर प्राथमिक विभागात धानोरा आणि माध्यमिक विभागात चामोर्शी पंचायत समितीने द्वितीय स्थान पटकावले.शनिवारी रात्री उशिरापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमांसह बक्षीस वितरण सुरू होते.जिल्हा परिदेच्या प्रांगणात संध्याकाळी समारोपीय कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी ओमकार पवार (भाप्रसे), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेलार (सा.प्र.), फरेंद्र कुतीरकर (जलजीवन मिशन),चेतन हिवंत (पंचायत), अर्चना इंगोले (महिला व बालकल्याण), अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.सतीशकुमार साळुंके,जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.दावल साळवे,कार्यकारी अभियंता (बांधकाम) विजय दोरखंडे यांच्यासह जि.प.चे सर्व खातेप्रमुख आणि जिल्हाभरातील अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये प्रत्येक तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी एकल व समुह नृत्य सादर केले. यादरम्यान अधिकाऱ्याच्या हस्ते प्रत्येक स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.या चारही दिवसांच्या कार्यक्रमांची संपूर्ण व्यवस्था लिलाधर भरडकर आणि त्यांच्या चमुने चोखपणे सांभाळली.

0/Post a Comment/Comments