*सिने कलाकार व्हायच असतील तर चला आलापल्ली. अमूल दुर्गे यांचे आवाहन*


*सिने कलाकार व्हायच असतील तर चला आलापल्ली. अमूल दुर्गे यांचे आवाहन*

*राजे धर्मराव कला वाणिज्य महाविद्यालय आलापल्ली येथे अभिनय कार्यशाळेचे आयोजन*

भास्कर फरकडे प्रतिनिधी

आलापल्ली: स्थानिक राजे धर्मराव कला वाणिज्य महाविद्यालय सांस्कृतिक विभाग व तेजय प्रॉडक्शन्स मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासीबहुल व नक्सलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी,शिक्षक ,परिसरातील तरुण यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, आणि त्यांना नवीन चित्रपट व वेबसिरिज मध्ये अभिनय करण्याची व त्याद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ ला सकाळी १०.३० वाजता राजे धर्मराव कला वाणिज्य महाविद्यालय आलापल्ली येथे विशेष अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यशाळेचा लाभ जास्तीत जास्त युवकांनी घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे जनतेचे व विद्यार्थ्यांन चे लाडके प्राचार्य डॉ.मारोती ऊध्दवराव टिपले व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. कू.प्रतिमा सूर्यवंशी यांनी केले. आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये अप्रतिम कौशल्य भरलेले आहे. मात्र ते प्रदर्शित करण्याचे ठिकाण मिळत नाही. हिच बाब हेरून सतत विद्यार्थ्यांनसाठी काहीतरी करण्यास धडपळ ना-या डॉ. मारोती ऊध्दवराव टिपले प्राचार्य राजे धर्मराव कला वाणिज्य महाविद्यालय आलापल्ली यांनी ही संधी दारात आणली आहे. या संधीचे लोकांनी सोने करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अमूल दुर्गे त्यांनी केले आहे.आणि
 अधिक माहितीकरीता संपर्क साधावे. 9518364283,8888467329 व 8390245801.

0/Post a Comment/Comments