आष्टी येथे रांगोळी स्पर्धेचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते उद्घघाटन


आष्टी येथे रांगोळी स्पर्धेचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते उद्घघाटन

आदिवासी सेल जिल्हा अध्यक्ष संतोष सोयाम यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी मदत करण्याची मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना केली मागणी

चामोर्शी : तालुक्यातील आष्टी येथील श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्थेच्या शिवजयंतीच्या निमित्ताने शिवाजी चौकात आज दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता रांगोळी स्पर्धेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले 
या रांगोळी स्पर्धेचे मंत्री ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते उद्घघाटन करण्यात आले महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.धर्मरावबाबा आत्राम यांचे आष्टी शहरात आगमन होताच श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले 


यावेळी मंचावर गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य तनुश्री आत्राम,आष्टी ग्रामपंचायतीचे सरपंचा बेबीताई बुरांडे,राष्ट्रवादी काँग्रेस गडचिरोली जिल्हा महीला उपाध्यक्ष पुष्पा व्यंकटी बुर्ले, आदिवासी सेल जिल्हा अध्यक्ष संतोष सोयाम, विधानसभा अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष युवा राष्ट्रवादी काँग्रेस प्रणय बुर्ले, ग्रामपंचायत सदस्य दिवाकर कुंदोजवार,आदी मान्यवर उपस्थित होते

आदिवासी सेल जिल्हा अध्यक्ष संतोष सोयाम यांनी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्थेच्या वतीने मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना आष्टी येथे शिवाजी चौक नावाने आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही करीता या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याकरीता आपल्या सहकार्याने आर्थिक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली या मागणीला मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारण्याकरीता आपण मदत करणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी आष्टी शहरातील व परिसरातील बहुसंख्य महिला पुरुष उपस्थित होते या रांगोळी स्पर्धेत शेकडो महिलांनी सहभाग घेतला यावेळी आष्टी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता

0/Post a Comment/Comments