अंगणवाडी सेविकांना पूर्व प्राथमिक शिक्षण आणि गूगल रीड अलॉन्ग अँप विषयी प्रशिक्षण


अंगणवाडी सेविकांना पूर्व प्राथमिक शिक्षण आणि गूगल रीड अलॉन्ग अँप विषयी प्रशिक्षण.

गडचिरोली :- २१/०२/२०२४
      आकांक्षित जील्हा गडचिरोली मध्ये नीती आयोगाची सहयोगी संस्था पिरामल फाऊंडेशन यांच्या मार्फत नीती आयोग निर्देशांक उंचवण्यासाठी शिक्षण,आरोग्य व पोषण या घटकावर जील्हा प्रशासना सोबत मिळून काम करत आहे. निपुण भारत अभियाना अंतर्गत अंगणवाडी सेवीकांची जबाबदारी व भूमिका, बालकाना शिकवण्याच्या सोप्या आणि नवीन पद्धती, कुपोषण कारणे व प्रकार, अनिमिया, स्तनपानाचे फायदे यासह विविध विषयावर राम नगर गडचिरोली या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आले. 
गडचिरोली राम नगर अंगणवाडी मध्ये प्रशिक्षण पार पडले. बाल विकास प्रक्लप अधिकारी ज्योति कडू अंगणवाडी प्रवेक्षीका आचल उलके पिरामल फाऊंडेशनचे अंकुश गांगरेड्डीवार (प्रोग्राम मॅनेजर, गडचिरोली) ,राहुल बारचे, अविनाश कंजे, उपस्थित होते.
अंगणवाडी सेविकांनी विविध कृतीमध्ये सहभाग घेतला. विविध कृतीच्या माध्यमातून प्रात्यक्षित सादरीकरण केले . त्याच बरोबर गूगल रीड अलॉन्ग ऐप विषयी माहिती जाणून घेतली. प्रशिक्षणाला गडचिरोली (शहरी) केंद्रातील एकूण ५० अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

0/Post a Comment/Comments