पाकिस्तान पुन्हा एकदा अस्थिरतेच्या दिशेने... प्रा डॉ सुधीर अग्रवाल वर्धा


पाकिस्तान पुन्हा एकदा अस्थिरतेच्या दिशेने...

प्रा डॉ सुधीर अग्रवाल वर्धा

पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा डळमळीत सरकारची भीती दिसून येत आहे. देशात झालेल्या निवडणुकांमध्ये नवाझ शरीफ आणि बिलावल भुट्टो, पीएमएल-एन आणि पीपीपी हे पक्ष मोठमोठे दावे करणारे रिकाम्या हाताने गेले आहेत. हे दोन्ही पक्ष बहुमतापासून दूर आहेत. एवढेच नाही तर दोन्ही पक्षांनी मिळविलेल्या जागा जोडल्या तरी या पक्षांना बहुमतासाठी १३४ जागा मिळतील असे वाटत नाही. त्यामूळे सरकार कोण बनवेल हे चित्र अद्याप तरी स्पष्टं होत नसले तरी नवाज शरीफ सरकार बनविण्याचा दावा करू शकतात.पाकिस्तानी लष्कराचा नवाज शरीफ यांना पाठिंबा असल्याने तेच पंतप्रधान पदाचा दावा करू शकतात लष्कराचा इम्रान खान यांना पाठिंबा नसल्याने व ते तुरुंगात असल्याने इम्रान खान दावा करू करू शकणार नाही.

पाकिस्तानच्या इतिहासात लष्कराची सत्तेत नेहमी महत्त्वाची भूमिका राहिली आहे. लष्कराला टाळून सत्ताधाऱ्यांना महत्त्वाचे निर्णय घेता येत नाही. देशाचा पंतप्रधान कोण होणार ते देखील वेळोवेळी लष्कर ठरवत आलं आहे. अलीकडचा विचार केल्यास २०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांना लष्कराने ‘सिलेक्ट’ करून पंतप्रधान बनवलेलं. परंतु इम्रान खान यांनी स्वतःला आपण लष्करापेक्षा मोठे आहोत, असं दाखवायला सुरुवात केली. त्यामुळे २०२२ च्या एप्रिल महिन्यात त्यांना सत्तेतून जावं लागलं. शाहबाज शरीफ पंतप्रधान झाले.

दुसरीकडे, पाकिस्तानच्या जनतेने कॅप्टन साहेब म्हणजेच माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या नावावर विश्वास व्यक्त केला आहे. इम्रान यांच्या नावावर ही निवडणूक लढविलेल्या अपक्षांना बऱ्यापैकी यश मिळाले असले तरी या अपक्षांकडे कोणीही नेता नाही. दुसरीकडे, पाकिस्तानच्या लष्करालाही इम्रान आवडत नाही. अशा स्थितीत भारताच्या या शेजारी देशात कोणाचे सरकार स्थापन होईल हे सांगणे कठीण आहे. इथे कोणत्याही पक्षाने सरकार स्थापन केले तर ते कितपत टिकाऊ असेल हे सांगणे त्याहून कठीण आहे.

निवडणुकीच्या निकालांवर नजर टाकली तर इम्रान खान यांना पाठिंबा असलेल्या अपक्ष उमेदवारांनी सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. ताज्या अपडेटनुसार त्यांना १००जागा मिळाल्या आहेत. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) ला ७१ जागा मिळाल्या, तर पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे पुत्र बिलावल भुट्टो झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला 53 जागा मिळाल्या. आतापर्यंत 264 पैकी 236 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. पाकिस्तानमधील सत्तेबाबत देशभरात रात्रभर गदारोळ सुरू आहे, तर महत्त्वाच्या बैठकाही सुरू आहेत. 

नवाज शरीफ युतीचे सरकार बनवण्यासाठी इतर गटांशी चर्चा करेल कारण ते स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्यात अपयशी ठरले आहेत. २६४ जागांपैकी तीन चतुर्थांश जागांचे निकाल जाहीर झाल्यानंतर शरीफ यांची घोषणा झाली. गुरुवारी मतदान संपल्यानंतर २४ तासांहून अधिक काळ लोटला असून, दहशतवादी हल्ल्यात २८ जणांचा मृत्यू झाला आहे. विश्लेषकांनी असा अंदाज वर्तवला होता की कदाचित कोणीही स्पष्ट विजेता नसेल. 

अपक्ष उमेदवारांनी सर्वाधिक जागा जिंकल्या.
निकालांवरून असे दिसून आले की, अपक्ष उमेदवार, ज्यांपैकी बहुतेकांना खान यांचे समर्थन होते, त्यांनी सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. सायंकाळी ६.३० वाजेपर्यंतच्या मतमोजणीच्या निकालानुसार त्यांना २४५ पैकी ९८ जागा मिळाल्या आहेत. शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) ला ६९ जागा मिळाल्या, तर पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे पुत्र बिलावल भुट्टो झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला ५१ जागा मिळाल्या. उर्वरित जागा लहान पक्ष आणि इतर अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या.
पाकिस्तानात पहिल्यांदा लष्कराच्या अपेक्षेप्रमाणे झाले नाही. विशेष म्हणजे इम्रान कुठल्याही परिस्थितीत पंतप्रधान होणार नाही हे लष्करासाठी महत्त्वाचे आहे. निवडणुकीसाठी इम्रान खान अपात्र होते आणि म्हणून ते पंतप्रधान होऊ शकणार नाही. पीटीआय समर्थक विजयी अपक्ष उमेदवारांवर वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणला जाईल. त्यांना नवाज शरीफ यांच्या पक्षाला मदत करण्यासाठी ‘समजावलं’ जाईल. मात्र येणारे दिवस पाकिस्तानसाठी अतिशय कठीण असतील.

९५६२५९४३०६

0/Post a Comment/Comments