धानोरा तालुक्यातील विद्यार्थी झाले आनंदित

धानोरा:दुर्गापूर केंद्रातील झाडापापडा, सोमलपूर, बोटेहुर, ढोरगट्टा तसेच पेंढरी केंद्रातील पेकीनमुडझा, गट्टा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये झालेल्या सिखेच्या प्रदर्शनीमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आनंद घेतला.
   गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात सिखे फाऊंडेशन मुंबई, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा शिक्षण विभाग गडचिरोली यांच्या संयुक्त माध्यमाने TIP (Teacher Innovator Programm) सन 2021 पासून सुरू आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विविध भाषा विषयाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. सन 2023-24 या सत्रात विद्यार्थ्यांना कथा कशी लिहायची, त्यामध्ये कोणकोणते घटक असतात, त्या सर्व घटकांचा गोष्टीमध्ये काय गरज आहे, चित्रावरून गोष्ट कशी तयार करायची, गोष्टीमधील विविध घटक कसे ओळखायचे याबाबत प्रत्येक शाळेमध्ये उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शिक्षकांद्वारे शिकवण देण्यात आली. 
     सदर उपक्रमाच्या अनुषंगाने दुर्गापूर केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झाडापापडा येथे 20 फेब्रुवारी, सोमलपूर आणि बोटेहुर येथे 21 फेब्रुवारी, ढोरगट्टा येथे 23 फेब्रुवार

0/Post a Comment/Comments