भास्कर फरकडे संपादक गडचिरोली वार्ता न्युज


बारावी परीक्षार्थ्यांना पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांनी फूल अन् शुभेच्छाही दिल्या 

आष्टी प्रतिनिधी -

फेब्रुवारी/ मार्च २०२४ इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षा दि. २१ फेब्रुवारी रोजी सुरु झाली. आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येणापूर, आष्टी येथील महाविद्यालयात विद्यार्थी परीक्षेसाठी देण्यात आलेले आहेत. बुधवारी परीक्षेचा पहिलाच दिवस. त्यात इंग्रजी या विषयाचा पेपर त्यामुळे विद्यार्थी थोडेसे तणावात असतात. विद्यार्थ्यांनी तणाव मुक्त्त वातावरणात परीक्षा द्यावी लागते यासाठी याकरिता विद्यार्थ्यांना गुलाब पुष्पाने स्वागत व शुभेच्छा देण्याकरीता आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह त्या अगदी वेळेवर केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांनी आपल्या मनोगतात शुभेच्छा देताना विद्यार्थ्यांनी कसल्याही तणावाखाली परीक्षा देऊ नये कारण दोन वर्षात तुम्ही जी मेहनत घेतलेली असते त्यामुळे तुम्हाला हि परीक्षा अजिबात कठीण जाणार नाही. म्हणून निर्भीडपणे तणाव मुक्त वातावरणात तुम्ही परीक्षा द्याव्यात. खुप मेहनत करावी म्हणजे भविष्यात पोलिस निरीक्षक होऊ शकाल. या केंद्रावर उपस्थित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या वतीने खुप खुप शुभेच्छा. महाविद्यालयातील प्राचार्य , शिक्षक यांनीही या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी, पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments