राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) च्या हळदी कुंकवाच्या व स्नेह मिलन कार्यक्रमात लक्षणीय उपस्थिती


राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) च्या हळदी कुंकवाच्या व स्नेह मिलन कार्यक्रमात लक्षणीय उपस्थिती

हजारोच्या संख्येने महिलांची उपस्थिती संपर्ण तालुक्यात हळदी कुंकवाची व स्नेह मिलन कार्यक्रमाची च चर्चा

अविनाश नारनवरे भामरागड तालुका प्रतिनिधी

दिनाक ६ भामरागड

भामरागड येथील भगवंतराव माध्यमिक आश्रम शाळेच्या पटांगणावर हळदी कुंकवाचा व स्नेह मिलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जिल्हा परिषद सदस्य तथा सिनेट सदस्य गोडवाना यूनिवर्सिटी गडचिरोली भाग्यश्री ताई आत्राम (हलगेकर)यांच्या संकल्पनेतून व महिला राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष मा.नदा नारनवरे ,शहर अध्यक्ष मीना तलांडे, किरण उसेंडी, सगुना मडावी, सगुना तिमा, व इतर महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांच्या माध्यमातून मकर संक्रांतीच्या निमित्ताने महिला मेळावा व हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
         या कार्यक्रमात महिलांनी हजारोच्या संख्येने सहभाग घेतला होता.
          महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही नेहमीच पुढाकार घेत असतो. सर्वांनी मिळून मिसळून राहणे गरजेचे आहे.तसेच महिलांच्या कोणत्याही समस्या असतील तर आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करु असे प्रतिपादन जी. प सदस्य तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम (हेलगेकर) यांनी केले.
        
            हळदी कुंकवाच्या व स्नेह मिळण्याच्या कार्यक्रमात विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत विजयी उमेदवाराला चांदीची, व सोन्याचे नाणी व आकर्षक बक्षीस देऊन गौरवण्यात येत होते. तसेच
       ज्या महिलांचे पती अर्ध्या वारच (सर्गवसी)सोडून गेले.अशा महिला आपला परिवारची जबाबदारी सभाळून मुलांना उच्च शिक्षण देऊन आदर्श निर्माण केले अशा महिलांचा साडी देऊन सत्कार करण्यात आला.
       तसेच या कार्यक्रमात भामरागड तालुक्यातील लक्की महिला कोण ते ईश्वर चीठी च्या माध्यमातून निवडण्यात आले.त्यामधे मंगला रामजी सडमेक यांना पैठणी साडी सोन्याची नात व चादीचा सिक्का देऊन गौरवण्यात आले.

 या कार्यक्रमात यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले होते.

0/Post a Comment/Comments